Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: दादा vs दादा; चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांची केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नेमकं काय घडलं?

अजित पवार-चंद्रकांत पाटलांमध्ये निधीवरून कोल्ड वॉर; थेट CM शिंदेंकडे केली तक्रार

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये निधीवरून कोल्ड वॉर रंगल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना निधी मिळाला नसल्याची तक्रार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती आहे.

पुण्यात मे महिन्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये ४०० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. परंतु तीन महिन्यांनंतरही अर्थखात्याकडून त्याला अद्याप मंजुरी नाही. अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची ही बैठक झाली होती. यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त १ जुलै रोजी तयार झाले आहे. त्यानंतर ते प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, २ जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर इतिवृत्त मंजुरीअभावी रखडले आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील कोल्डवॉरचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदावर अजित पवार यांची नियुक्ती होणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दुसरीकडे या पदावर चंद्रकांत पाटील हेच कायम राहावे, यासाठी भाजपचे काही नेते आग्रही आहेत. तर पुण्याचे पालकमंत्रीपद मिळेपर्यंत कोणत्याही कारभारात ढवळाढवळ करणार नाही, अशी अजितदादांची भूमिका होती.

पुण्यातील प्रलंबित विकासकामांना निधी मिळत नाही, असं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे. अजित पवार यांच्या दबावामुळेच ती रखडल्याची तक्रार भाजपच्या गोटातून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करताच मुख्यमंत्र्यांनीही तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांना धारेवर धरल्याची चर्चा आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT