अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही, असं ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी केलेलं ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे. (Comment on Uddhav Thackeray by Ardhvatrao Devendra Fadnavis maharashtra politics)
'अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही... असो, आता ऐका...याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला ...म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला ! ' अशा आशयाचे ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.
फडणवीस ठाकरेंना असं का म्हणाले?
'यांच्या डोक्यात कुठून व्हायरस घुसला आहे, काय माहिती. कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का? संशोधक गवत उपटत होते का? असे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू म्हणल्यानंतर यांना कोणतं व्हॅक्सिन द्यायचं ते ठरवावं लागेल. यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे', असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोबतच फडणवीस यांनी त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओही ट्वीटरवर शेअर केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.