Gunratna Sadavarte esakal
महाराष्ट्र बातम्या

Breaking News: गुणरत्न सदावर्तेंना धक्का! ST बँकेच्या संचालक पदावरुन सौरभ पाटील यांची हकालपट्टी

एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सहकार आयुक्तांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (Sourabh Patil) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सहकार आयुक्तांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी मोठा धक्का दिला आहे. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्याने पदावरुन हटववण्यात आलं आहे. एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बँकेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. काही दिवसांपासून एसटी बँकेचे संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

या संबंधीचे आदेश पुणे सहकार आयुक्तांनी दिले आहेत. कलम 79 अन्वये सौरभ पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्तेंचे मेहुणे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

काय आहे कारण?

सौरभ पाटील यांना बँकिग क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नाही. तसेच या पदासाठी वयाची ३५ वर्ष पुर्ण झालेली असावीत अशी अट आहे. मात्र सौरभ पाटील यांचे वय २५ च्या आसपास आहे. तसेच नियमानुसार त्यांच्याकडे आठ वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभवही नाही, असा आरोप करण्यात आला होता. मात्र, सौरभ पाटील हे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या निकषात बसत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT