maharashtra cm-mazhi ladaki bahin
महाराष्ट्र बातम्या

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण’साठी आता जिल्हा, तालुकास्तरावर समित्या! तालुका समितीत 3 अशासकीय सदस्य; समितीचे अध्यक्ष भाजप, राष्ट्रवादी की शिवसेनेचे पदाधिकारी?

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तीन दिवसांत दोन शासन निर्णय निघाले आहेत. पहिल्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी होते, पण आता अध्यक्ष पालकमंत्री आहेत. तर तालुक्याला समितीच नव्हती, पण आता तालुक्याला समिती गठित करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष अशासकीय सदस्य असून दोन अशासकीय सदस्यांचाही त्यात समावेश असणार आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप महायुतीच्याच पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या, निराधार महिला आणि राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या व निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेलाच लाभ दिला जाणार आहे. योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असून योजनेसाठी पात्र महिलांना तूर्तास अंगणवाड्यांमध्ये ऑफलाइन अर्ज जमा करता येणार आहे. दुसरीकडे ‘नारीशक्ती’ ॲपवरून देखील ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. मात्र, ॲपला सर्व्हर डाउनचा अडथळा येत असून तीन-चारवेळा प्रयत्न केल्यावर अर्ज भरता येत असल्याचे अनुभव अनेकांना येत आहेत. योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज भरल्यानंतर त्याबदल्यात अंगणवाडीसेविकांना अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रति लाभार्थी ५० रूपयांचा भत्ता दिला जाणार आहे. योजनेचा लाभ ३१ ऑगस्टपूर्वी सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी शासन निर्णयात बदल करून तालुकास्तरावरही समित्या नेमल्या जाणार आहेत. या समितीचे अध्यक्ष व सदस्य होण्यासाठी आता महायुतीमध्येच चुरस पाहायला मिळणार आहे. योजना ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल. ऑक्टोबरमध्ये मतदान होणार आहे. त्यावेळी प्रचारानिमित्त हेच अशासकीय सदस्य प्रचाराचे मुख्य चेहरे असणार आहेत, असेही बोलले जात आहे.

जिल्हास्तरीय समिती

  • अध्यक्ष : पालकमंत्री

  • सहअध्यक्ष : जिल्ह्याचे मंत्री

  • सदस्य : झेडपी सीईओ, पोलिस अधीक्षक, सहआयुक्त (नगरप्रशासन), महापालिका आयुक्त किंवा उपायुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

  • सदस्य सचिव : जिल्हाधिकारी

----------------------------------------------------------------------------

तालुकास्तरीय समिती

  • अध्यक्ष : अशासकीय सदस्य

  • सदस्य सचिव : तहसीलदार

  • सदस्य : नगरपालिका मुख्याधिकारी, सहायक आयुक्त, सहायक अधिकारी (समाज कल्याण), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सहायक प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), एक अंगणवाडी पर्यवेक्षिका, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), दोन अशासकीय सदस्य

तालुक्याच्या समितीत ३ अशासकीय सदस्य

योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा, यासाठी नेमलेल्या तालुकास्तरीय समितीत तीन अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता या समितीतील ते अशासकीय सदस्य कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात महायुतीचे सरकार असून त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. तिन्ही पक्षातील एक एक सदस्य असणार की सगळेच सदस्य भाजपचे असणार, याचीही उत्सुकता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाधिकाऱ्यांना तालुक्याच्या समितीत घेऊन योजनेतून सरकारबद्दल सहानुभूती वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gunaratna Sadavarte Death Threat : बिग बॉसच्या घरात जाण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी!

Stock Market: चीनच्या शेअर बाजारात विक्रमी वाढ! सध्या कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे फायद्याचे?

Varsha Usgaonkar : "माझ्या भावनांचा उद्रेक होईल यासाठी टपून राहिले होते.." वर्षा उसगांवकरांनी केले खुलासे

Rahul Gandhi यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होणं ही दुर्देवी घटना, शिंदे गटाच्या आमदाराची जीभ पुन्हा घसरली!

Latest Marathi News Live Updates: मुंबईतील मीरा रोड परिसरात ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमात गोंधळ

SCROLL FOR NEXT