Road accident in Maharashtra Esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील सर्वाधिक अपघात मुंबईत; रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Road accident in Maharashtra: जानेवारी- नोव्हेंबर या अकरा महिन्यात मुंबईत तब्बल १,८४४ रस्ते अपघात झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ (Road Accident in Maharashtra):

रस्ते अपघाताची मालिका वाढत चालली आहे.गेल्या वर्षात राज्यात २६ हजार २८४ रस्ते अपघात (Road Accident) झाले आहे. यामध्ये १४ हजार २६६ प्रवासी जखमी झाले असून रस्ते अपघातात ११ हजार ९६० प्रवाशांचा मृत्यू (Death)झालेला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत (Mumbai) झाल्याची माहिती समोर आली. जानेवारी- नोव्हेंबर या अकरा महिन्यात मुंबईत तब्बल १,८४४ रस्ते अपघात झाले आहेत. यामुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले (The number of accidents increased in the state)-

राज्यात २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये अधिक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२०मध्ये लॉकडाऊन असतानाही राज्यातील अपघातांची संख्या २४ हजार ९७१वर पोहचली होती. या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर १३ हजार ९७१ लोक गंभीर जखमी झाले होते. याउलट २०२१ मधील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये २६ हजार २८४पर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय संबंधित अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा हकनाक जीव गेला असून १४ हजार २६६ लोक गंभीर जखमी झाले आहे.विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत झाल्याची माहिती समोर आली. जानेवारी- नोव्हेंबर या अकरा महिन्यात मुंबईत १ हजार ८४४ रस्ते अपघात झाले आहे. या अपघात २५८ नागरिकनांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार २४३ लोक गंभीर जखमी आहे.

या जिल्हा सर्वाधिक अपघात-

मुंबई १ हजार ८४४,

नाशिक १२९६,

पुणे १२२८,

अहमदनगर १२०७,

कोल्हापूर ९२६,

सोलापूर ८६२,

नागपूर ८६०,

सातारा ७२९,

ठाणे ७०७,

नांदेड ६९३,

जळगाव ६६७,

बीड ६३२,

चंद्रपूर ६२८,

या जिल्हात जानेवारी- नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत.

सर्वाधिक अपघाती मृत्यू या जिल्हात -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यांत रस्ते अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघाती मृत्यूमध्ये वाढ झालेल्या जिल्ह्यामध्ये नाशिकचा पहिला क्रमांक लागतोय.

नाशिकमध्ये ७८४,

पुणे ७२०,

सोलापूर ४८३,

सातारा ४३५,

अहमदनगर ६९३,

जळगाव ४४३,

बीड ३८५

कोल्हापूर ३४६

आणि औरंगाबादमध्ये ३६५ अपघाती मृत्यू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT