Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: राज्य शासन- जरांगे पाटील यांच्यात वाढणार संघर्ष? आरक्षण समितीने मागितली दोन महिन्यांची मुदतवाढ; आंदोलक मात्र ठाम

मराठा आरक्षणाचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मराठा आरक्षणाचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे -पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीला अवघे तीन दिवस उरले असतानाच, आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या न्या. संदीप शिंदे समितीने आपला अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. समितीच्या या मागणीमुळे राज्य सरकार आणि जरांगे-पाटील यांच्यातील संघर्ष वाढून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चिघळणार का? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे.

विशेषत्वे, आरक्षणासंबंधीच्या समितीने मागितलेली मुदतवाढ आणि दुसरीकडे राज्य सरकारला आरक्षणासाठीची दिलेल्या मुदतीचे उरलेले तीन दिवस हे पाहता शासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सरकार आता नेमकेपणाने यातून कसा ‘सुवर्ण’मध्य काढणार? राज्यातील सकल मराठ्यांचे नेतृत्व करणारे जरांगे-पाटील कोणती भूमिका घेणार? हे पाहणे आता अत्यंत औत्सुक्याचे आहे.

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या न्या. संदीप शिंदे समितीने काही पुरावे गोळा करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. तथापि, सरकारने समितीला वेळ देण्यासंदर्भात अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर समिती स्थापन करताना मराठा आरक्षणाचे मुख्य प्रवर्तक मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे ४० दिवसांची मुदत घेतली आहे. ती मुदत २४ तारखेला संपत आहे. ही मुदत संपण्यादरम्यानच समितीने तब्बल दोन महिन्यांची मुदतवाढ मागितल्याने मराठा आरक्षणावर रान पुन्हा पेटले जाऊ शकते.

समिती वगैरे माहिती नाही, आरक्षण द्या !

जरांगे-पाटील आरक्षणाच्या मुद्यावर ठाम आहेत. आरक्षणासाठीची समिती, तिचा अहवाल, आयोग वगैरे आम्हाला काहीच माहिती...मराठा आरक्षण द्या, ते घेण्यासाठी एक इंचदेखील मागे हटणार नाही, ही त्यांची भूमिका आहे. २४ तारखेपर्यंत शासनाला दिलेली मुदत आहे, तोपर्यंत काही बोलायचे नाही, त्यानंतर बघू. शांततेत सुरु केलेल्या मराठा आंदोलनाची दखल सरकारला घेणे भाग पडेल, असे जरांगे-पाटील म्हणताहेत.

जरांगे-पाटलांच्या पुन्हा सभा अन्आरक्षणाचे झंझावाती वादळ

ऐतिहासिक सभेचा टप्पा पार पडल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांना पुन्हा राज्यभरात सभा घेण्याचा सिलसिला चालू ठेवलाय. या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. राज्यभरात मराठा आरक्षणाचे झंझावती वादळ घोंघावत आहे. शिवाय प्रसारमाध्यमांमध्ये जरांगेंच्या मुलाखती प्रचंड गाजताहेत. आरक्षणासाठी वातावरण पेटले आहे.

अभ्यास समिती आज धाराशिवमध्ये

सकल मराठा समाजला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती रविवारी (ता. २२ ) धाराशिवमध्ये येत आहे. निजाम राजवटीत ‘कुणबी’ असा उल्लेख असलेले काही पुरावे आहेत. शिवाय तत्कालीन वेळी शेती करणाऱ्या मराठ्यांचा कुणबी असा उल्लेख आहे. यासंबंधीची माहिती ही समिती धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT