Vidhansabha  sakal
महाराष्ट्र बातम्या

Vidhansabha : अभिनंदनाच्या ठरावावरूनही खडाजंगी!

सकाळ वृत्तसेवा

भारतीय क्रिकेट संघाने टी २० स्पर्धेत विजेतपद मिळवल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करताना ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्ष व विधानसभेचे आमदार आशिष शेलार यांचेही अभिनंदन केले जावे, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केल्याने विधान परिषदेत विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेत बोलण्याची परवानगी मागितली. मात्र सभापती यांनी दानवे यांना बोलू दिले नसल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावर भाजपकडून विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर इतका खाली गेला का, आपला एक सहकारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अधिकारी आहे. त्याचे स्वाभाविकपणे आपण अभिनंदन केले पाहिजे. हे करण्यात कोणता कमीपणा आहे, असे विरोधकांना सुनावले.

सभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावर कोणताच निर्णय घेतला नाही. प्रस्तावाच्या तपशीलाबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यापूर्वीच आपण इतके असहिष्णू वागू नका. गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय होईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. मात्र विरोधकांनी सभापतींचा निषेध करत सभात्याग केला.

मोदी, शहांचे मानले आभार

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन फौजदारी कायदे सोमवारपासून देशात लागू झाले आहेत. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. ब्रिटीशांनी केलेले कायदे हे भारतीयांवर राज्य करण्यासाठी केले होते. पण भारतीय संसदेच्या कायदे केले आणि ते आजपासून लागू झाले आहेत, असे फडणवीस म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT