Congress leader Balasaheb Thorat esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thorat : 'त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, त्यामुळं एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

सध्या राज्यात राजकीय गोंधळाची परिस्थिती आहे. यापूर्वी ती कधीही पाहिलेली नाही. माझी विधानसभेची आठवी टर्म आहे.

हेमंत पवार

'काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. विधानसभा आणि लोकसभेला निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाऊन काँग्रेस पक्ष राज्यात नंबर एकवर आम्ही आणू.'

कऱ्हाड : सध्या राज्याला एक मुख्यमंत्री आहेत, एक पूर्वीचे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहेत आणि सध्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत. त्यात आता तीन तलवारी घालण्याचे काम राज्यात सुरू आहे, असं स्पष्ट आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

ते (शिंदे-फडणवीस-अजित पवार) एकमेकांना समजून घेऊन कारभार करतील, असे दिसत नाही. सरकारविरोधात सर्वसामान्यांत मोठी नाराजी आहे. काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. उलट विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाऊन काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरवर आणू, असा विश्वास माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या जयंतीदिनी अभिवादनासाठी श्री. थोरात आज येथे आले होते. त्याचदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, ‘‘सध्या राज्यात राजकीय गोंधळाची परिस्थिती आहे. यापूर्वी ती कधीही पाहिलेली नाही. माझी विधानसभेची आठवी टर्म आहे. राजकारण बदलते, काही बदल होतात. मात्र, एका वर्षात दोन पक्ष फोडणे, लोकं बरोबर घेणे असे कधीही राज्याच्या राजकारणात घडलेले नाही. भाजपने सत्तेसाठी काहीही हे ध्येय वाक्य घेऊन सरकार बनवले आहे.

सरकार बनवल्यानंतरही खातेवाटप व्यवस्थित होत नाही. नवीन मंत्रिमंडळ वाढीची आमदार वाट पाहात आहेत. त्यातून संघर्षाचे वातावरण आमदारांत असून, नाराजीचा सूर असल्याचे दिसत आहेत असे सांगत ते म्हणाले, महाराष्ट्रात १५ जुलै आला, तरीही पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत. जेथे पेरण्या झाल्या आहेत त्याला पाणी नसल्याने पिके वाया जाऊन दुबार पेरणीची संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत हवालदिल परिस्थिती निर्माण झाली आहे.

महागाईतही मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य अस्वस्थ असून, त्यांचा खर्चाचा मेळ बसत नाही. त्याकडे सरकार म्हणून जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलेले दिसत नाही. शेतकऱ्यांना गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कांदा नुकसानीबाबत जी मदत द्यायला पाहिजे, ती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी दिसत आहे.’’

काँग्रेसला आता विरोधी पक्षपद मिळेल, असे सांगून ते म्हणाले, ‘‘काँग्रेसचे श्रेष्ठी त्यासंदर्भात कोणाला संधी द्यायचे त्याचा निर्णय घेतील. काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही. विधानसभा आणि लोकसभेला निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाऊन काँग्रेस पक्ष राज्यात नंबर एकवर आम्ही आणू.’’

विलासकाकांचे कॉँग्रेससाठी मोठे योगदान

ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे नेतृत्व मी अनेक वर्षे पाहिले आहे, असे सांगून आमदार थोरात म्हणाले, ‘‘काका अत्यंत स्पष्टवक्ते होते. कोणतीही गोष्ट करताना चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, असे त्यांचे तत्त्व होते. काँग्रेस पक्षासाठी भक्कम विचार मांडून त्यादृष्टीने वाटचाल करणारे ते व्यक्तिमत्त्व होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT