देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक पार पडत आहे. या बैठकासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव यांच्यासह देशभरातील मोदी सरकार विरोधी महत्वाचे नेते मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या नेत्याचे फोटोसेशन सुरू असतानाच अचानकपणे एका बड्या नेत्याने हजेरी लावली.
दरम्यान या नेत्याच्या येण्यामुळे बैठकीसाठी उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी पसरल्याचे दिसून आले आहे. राजकारणाची चांगली जाण असणारे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या बैठकीत हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यांच्या येण्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता दिसून आली. काही दिवसांआधी कपिल सिब्बल हे काँग्रसमधून बाहेर पडले आहेत. अशातच त्यांनी अचानकपणे बैठकीला लावलेली हजेरी चर्चेत आली आहे.
दरम्यान काँग्रेसमधून बाहेर पडताना कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावरतीही टीका केली होती. अशात आता इंडियाच्या बैठकीत ते अचानकपणे आल्याने उपस्थितांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. जमलेल्या सरेव नेत्यांचे फोटोसेशन सूरू असतानाच सिब्बलांची एन्ट्री झाली. फोटोसेशन वेळी काही नेत्यांची नाराजी दिसून आली.
काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची देखील नाराजी स्पष्टपणे दिसली. जमलेल्या इतर नेत्यांनी कपिल सिब्बल यांचे स्वागत केले. त्यानंतर कपिल सिब्बल देखील फोटोसेशनमध्ये सामिल झाले.
कपिल सिब्बल मे २०२२ध्ये काँग्रेस सोडून समाजवादी पक्षामध्ये सामील झाले होते. कपिल सिब्बल यांचे नाव काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांमध्ये घेतले जाते. कपिल सिब्बल यांनी केंद्रीय कायदे मंत्रीपदी देखील काम केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यासंबधीचे वृत्त 'आज तक'या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.