Congress Sakal
महाराष्ट्र बातम्या

Congress मध्ये नाराजीनाट्य; प्रमुख नेते बैठकीला फिरकलेच नाहीत, जे आले त्यांनी...

बैठकीला गैरहजर राहिलेल्या बडे नेते आणि आमदारांची नावे पक्षातील अन्य नेत्यांकडूनच कळवली जात असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरु होते.

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे असा एक ओळीचा ठराव काल प्रदेश काँग्रेसने एकमताने मंजूर केला खरा पण भारतातील सर्वात जुन्या आणि लोकशाहीवर दृढ विश्वास असलेल्या पक्षात निवडणूक प्रक्रिया सुरु केल्याबद्दल सोनिया गांधी यांचे आभार मानणारा ठराव माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मांडूच दिला गेला नाही. काल झालेल्या प्रदेशाच्या बैठकीला चार ते पाच जण वगळता सर्व माजी मंत्री गैरहजर होते असे समजते.

सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार या माजी मंत्र्यांना वारंवार विनंती करुनही ते मंचावर गेलेच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षांतर्गत निवडणुकीचा आग्रह धरणाऱ्या जी २३ या गटाचे सक्रिय सदस्य असलेले पृथ्वीराज चव्हाण बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वी गटचर्चेत आभार मानण्याचा ठराव मांडतो असे म्हणाले. निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडणे अत्यंत योग्य पाऊल आहे.काँग्रेसजनांच्या भावनांची दखल घेत सोनिया गांधी यांनी निवडणूक कार्यक्रम सुरु केला हे योग्य आहे. राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे अशी कार्यकर्त्यांनी मागणी आहे. निवडून आलेले अध्यक्ष या नात्याने ते अन्य भाजपेतर पक्षांची आघाडी प्रभावीपणे उभारतील. भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसच्या झेंडयाखाली झालेली आघाडी लोकमान्य होईल अशी भावना चव्हाण यांना व्यक्त करायची होती.

या भावना अत्यंत योग्य आहेत पण त्या मंचावर मांडू नका ,त्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी आणि शीर्षस्थ नेत्यांना कळवू असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यानंतर निर्धारित वेळेत बडे नेते हजर झाले नसल्याने बैठक पुढे ढकलली गेली. अखेर दीड दोन तासांच्या प्रतीक्षेनंतरही डॉ.नितीन राऊत ,अमित देशमुख ,सतेज पाटील ,वर्षा गायकवाड ,यशोमती ठाकूर ,अस्लम शेख असे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद सांभाळलेले नेते फिरकलेच नसल्याने कामकाज सुरु झाले. सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार हे माजी मंत्री हजर होते. त्यांनी मंचावर यावे अशी विनंती करूनही ते काही कारणाने नाराज असल्याने वर गेले नाहीत असेही सांगण्यात येते आहे.

याविषयी संपर्क साधला असता वडेट्टीवार म्हणाले," नाराजी ही अफवा आहे. ठराव पारित करणे हे आजचे उद्दिष्ट होते. आम्ही त्यासाठी मंचावर जाणे आवश्यक नव्हते." दरम्यान आज तरुण पिढीतले नेते ठरवून गैरहजर असल्याचीही चर्चा सुरु आहे. प्रणिती शिंदे ,संग्राम थोपटेही हजर नव्हते. माजी मंत्री विश्वजित कदम शेवटी शेवटी हजर झाले. त्यातच अध्यक्षपदावर निवडून येणारी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य निवडणार असल्याचा ठराव पारित करण्यात आला.पक्षाचे पदाधिकारी नेमले जाणार की निवडले जाणार असा प्रश्न केला जातो आहे.

त्यातच अध्यक्षपदावर निवडून येणारी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य निवडणार असल्याचा ठराव पारित करण्यात आला.पक्षाचे पदाधिकारी नेमले जाणार की निवडले जाणार असा प्रश्न केला जातो आहे.

दरम्यान प्रदेश काँग्रेसने पाठवलेल्या पत्रकानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी बैठकीत ठराव मांडले. प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना तुमच्या भावना कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.

बैठकीला गैरहजर राहिलेल्या बडे नेते आणि आमदारांची नावे पक्षातील अन्य नेत्यांकडूनच कळवली जात असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरु होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशीरापर्यंत यशस्वी झाला नाही. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप बैठकीला काही वेळ हजर असल्याचे समजते.

शशी थरुर मैदानात ?

दरम्यान शशी थरुर यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे.ते सोनिया गांधींना भेटले आहेत असे येथे बोलले जाते आहे.

अशोकरावांना अध्यक्ष करा

नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत निवडणुकीत अपयशी होत कॉंग्रेसच्या जागा कमी झाल्याने आता अशोकराव चव्हाण यांना अध्यक्ष करा ही मागणी जोर धरते आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात रेवंत रेड्डीचं तेलगू भाषेत भाषण; मोदींवर केली टीका

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT