वणी (जि. यवतमाळ) : ''आर. एस. एस. चे माजी सरसंघचालक हेडगेवार (RSS Former Chief Hedgewar) यांच्याबाबतचा किस्सा सांगत असताना असे हे गुलाम आपआपल्या शिकवायला लागले'', असं खळबळजनक विधान ऊर्जामंत्री नितीन राऊत (Congress Minister Nitin Raut) यांनी केलं आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी 24 जानेवारीला प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
''कालच सुभाषचंद्र बोस यांची जयंती झाली. कुठेतरी वाचलं की नाशिकला आरएसएसचे माजी सरसंघचालक हेडगेवार होते. त्यांना भेटण्यासाठी बोस यांनी खासगी सचिवाला निरोप घेऊन पाठवले. खासगी सचिवांनी हेडगेवारांच्या माणसाला म्हटलं, की मला हेडगेवारांना भेटायचं आहे. सचिव दारातच उभा होता. त्या व्यक्तीने आत जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा संदेश असून त्यांचा खासगी सचिव आला आहे, असं सांगितलं. त्यावेळी हेडगेवार यांनी टिंगल उडवत भेट नाकारली व म्हणाले की, त्यांना सांग की मी आजारी आहे. मी जर त्यांना भेटलो तर ब्रिटिश माझ्या सोबत काय करतील, मला तुरुंगात टाकतील. हे वाक्य बाहेर उभा असलेल्या खासगी सचिवांने ऐकलं. असे हे गुलाम लोक आज आपल्याला शिकवायला लागले'', असं नितीन राऊत म्हणाले.
जाती धर्मात तेढ निर्माण करत असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला. नुकतेच नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य करून रोष ओढून घेतला आहे, त्यातच राऊत यांच्या विधानाने नवा वाद होण्याची शक्यता आहे.
''आम्ही थारा देत नाही''
हे लोक सत्तेसाठी हपापलेले आहेत. त्यामुळे ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हिंदूत्ववादी संघटनांचा विरोध करणे हे त्यांचे नेहमीचे काम आहे. त्याला इतिहास माहिती नसल्याने ते बेताल वक्तव्य करीत आहे. अश्या लोकांना संघ थारा देत नाही, अशी प्रतिक्रिया आरएसएसचे यवतमाळ जिल्हा सहकार्यवाह प्रशांत भालेराव यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.