Kolhapur Bank Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

आवाडेंच्या पराभवामागे काँग्रेस की राष्ट्रवादी? सोयीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी

जिल्हा बँकेच्या विजयाने चपराक; प्रक्रिया गटात ‘मॅच’ फिक्स

निवास चोैगले

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव (Kolhapur Bank Election)कोणाचा करायचा यापेक्षा निवडून कोणाला आणायचे या सोयीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा मात्र बळी गेला आहे. आपण म्हणेल ती पूर्व दिशा, मी म्हणेल त्यालाच उमेदवारी, अमूक एखादा निवडून आलाच पाहिजे या नेत्यांच्या महत्त्‍वकांक्षेलाही जिल्हा बँकेच्या विजयाने चपराक बसली आहे. यातून प्रक्रिया गटातील ‘मॅच’ फिक्सच होती हे विजयी उमेदवारांना पडलेल्या मतांवरून स्पष्ट होते.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बँकेचे अध्यक्ष ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी भाजपसोबत असलेल्या आमदार विनय कोरे (Vinay Kore) व प्रकाश आवाडे (Prakash Awade)यांच्याशी चर्चा सुरू ठेवली. त्याचवेळी सत्तारूढमध्ये बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना घ्यावे यासाठी मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरू होते. त्याला कोरे यांनी तीव्र विरोध दर्शवला. कोरे यांच्या भूमिकपुढे मुश्रीफ हतबल झाल्याचे दिसून आले. त्यातून आसुर्लेकर यांना डावलण्यात आले. याच गटात प्रा. संजय मंडलिक यांची सत्तारूढमधून उमेदवारी निश्‍चित होती. पण, शिवसेनेकडून पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar)यांनी आपले बंधू प्रा. अर्जुन यांच्या उमेदवारीची मागणी केली. त्याला माजी आमदार के. पी. पाटील (K.P.Patil)यांनी विरोध केला. याच के. पी. यांना ‘गोकुळ’(Gokul) मध्ये मात्र आबिटकर चालले. कारण त्यांचा मुलगा उमेदवार होता. ‘गोकुळ’च्या राजकारणातही आबिटकर हे त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याच्या मानसिकतेत होते.

पण, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास हसन मुश्रीफ यांनी त्यांचे मन वळवले. त्यातून त्यांना दोन जागा देण्यात आल्या. आबिटकर यांनीही या दोन जागांवर आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली. आता आपल्या बंधूला ही जागा मिळावी ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती. ही जागाच शिवसेनेने प्रतिष्ठेची केली. आसुर्लेकर असतील तरच मी तुमच्यासोबत म्हणत इच्छा नसताना प्रा. मंडलिक यांनाही सत्ताधाऱ्यांसोबत काडीमोड घेऊन शिवसेनेचे पॅनेल तयार करावे लागले. गेल्या तीन वर्षांपासून विधानसभेत पतसंस्थांच्या प्रश्‍नावर उठवलेला आवाज, त्यातून पतसंस्थाशी आलेली जवळीक यातून आबिटकर यांचा पतसंस्था गटातील विजय सुकर झाला. पण, याच गटातील आवाडे यांचा पराभव धक्कादायक आहे. आवाडे यांच्या पराभवामागे काँग्रेस की राष्ट्रवादी? का दोघेही? याची चर्चा होणे स्वाभाविक आहे.

कोरेंची समजूत काढून आसुर्लेकर यांना संधी दिली असती तर कदाचित दुसरे पॅनेलही झाले नसते. सोयीचे राजकारण करताना प्रा. मंडलिक व आसुर्लेकर यांच्या गटात मदन कारंडे व प्रदीप पाटील-भुयेकर यांच्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांचा बळी देण्यात आला. करवीरमध्ये भुयेकर यांनी पी. एन. यांच्या विरोधात काम केले. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा राग होता. करवीरमध्ये सत्तारूढ गटाच्या उमेदवारांना दोनच मते मिळाली यावरून हा राग दिसून येतो. कागलसह इतर तालुक्यात मंडलिक-आसुर्लेकर यांना पडलेल्या मतांवर नजर टाकली तर या गटातील ही कुस्ती नेते कितीही नाही म्हणत असले तरी ती ‘नुरा’च होती हे स्पष्ट झाले.

बँकेचा नेता तो जिल्ह्याचा नेता

जिल्हा बँक कोणाच्या ताब्यात तो जिल्ह्याचा नेता असा एक प्रघात आहे. पॅनेल ठरवताना हे समीकरणही डोक्यात ठेवण्यात आले. पूर्वी रत्नाप्पा कुंभार विरूद्ध श्रेष्ठी, कुंभार विरूद्ध उदयसिंगराव गायकवाड, श्रीपतराव बोंद्रे असा संघर्ष जिल्ह्याने बघितला आहे. त्यावेळी बँक नेत्यांच्या अधिपत्याखाली असायची. आता त्याच्या उलटे चित्र पहायला मिळाले आहे. मी किंवा माझा वारसदार कुटुंबातीलच ही मानसकिता तयार झाली. त्यातून बँकेवर आमदार, खासदार, मंत्री किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती संचालक झाले. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांतही ही सलही आहे.

आगामी राजकारणावर परिणाम

या निकालाचा परिणाम विधानसभेच्या राजकारणावर होणार आहे. विशेषतः भुदरगड तालुक्यात के. पी. यांची विकास संस्था गटातील २० हून अधिक मते फुटली. कारखान्यात मीच, ‘गोकुळ’, बँकेत माझा मुलगा या घराणेशाहीचा त्यांना फटका बसल्याचे दिसले. त्यांच्या विरोधानंतर आबिटकर विजयी झाल्याने त्यांची तालुक्यातील ताकद वाढली. त्याचे पडसाद भविष्यात विधानसभेतही उमटणार आहेत. प्रा. मंडलिक यांच्या विजयाने मुश्रीफ यांना विधानसभेत आधार झाल्याचे बोलले जाते. माजी आमदार संजय घाटगे त्यांच्यासोबतच आहे. या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या दोघांत झडल्या असल्या तरी निकालावरून आरोपात किती तथ्य होते हेही स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT