राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.
दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेलेल फुटीनंतर विरोधीपक्षनेते पद काँग्रेस कडे येणार आहे. तसेच महराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील बदलाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होतं आहे. आज दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक होत असून याबद्दल लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील बंडानंतर आता राष्ट्रवादी पक्षात देखील दोन गट पडले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल याबद्दल देखील उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तसेच अजित पावारांसह राष्ट्रवादीच्या एकूण नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली.
तसेच अजित पवारांनी त्यांच्याबरोबर ३० हून जास्त आमदार असल्याचे बोलले जात आहे. आमदारांची नेमकी संख्या अद्याप कोणीही स्पष्ट केलेली नाही. मात्र राष्ट्रवादीतील फुटीमुळे पक्षाची विधानसभेतील ताकद मात्र कमी झाली आहे. त्यामुळे मविआमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विरोधीपक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहे. यादम्यान आज दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस तसेच विरोधीपक्ष नेतेपद कोणाला मिळणार याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष बदलणार?
दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रदेशाध्यक्ष न बदलण्याची हायकमांडची मानसिकता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नाना पटोले यांचं काँग्रेस पक्षाध्यक्षपद कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीला आणखी मजबूत करण्याची काँग्रेसची भूमिका आहे.
इतकेच नाही तर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येणार आहे. हे पद काँग्रेसमधील कोणत्या नेत्याकडे सोपवलं जाईल यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
विरोधीपक्षनेते पद कोणाकडे जाणार?
राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदारांच्या संख्येनुसार विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. दरम्यान या पदासाठी काँग्रेसमधून अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार या नावांची चर्चा सर्वाधिक होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.