congress sachin sawant questions bjp over adwani visit to mausoleum of Jinnah in Aurangzeb row  
महाराष्ट्र बातम्या

अडवाणींवर कोणती कारवाई केली?; औरंगजेब कबर प्रकरणी काँग्रेसचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावरून आता नवा वाद पेटला आहे. ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान गुरुवारी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. याच घटनेबद्दल राज्यभरातून नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने ओवेसी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी कॉंग्रेसने भाजपने आधी अडवाणींवर कोणत्या आयपीसीच्या कलमानुसार कारवाई केली? असा सवाल केला आहे.

कॉंग्रेसचे नेत सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपला धारेवर धरलं आहे, त्यानी लिहीले आहे की, औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसी गेले तर बोंब ठोकून कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपाने व भाजपाच्या पिट्टूंनी आधी 'जीना'च्या कबरीवर गेलेल्या अडवाणींवर कोणत्या आयपीसीच्या कलमानुसार कारवाई केली? भाजपाचे सहयोगी नितीशकुमारांनाही जेलमध्ये का टाकले नाही? यांचे उत्तर द्यावे. अजून देश संविधानाने चालतो, असे सावंत म्हणाले आहेत.

तसेच पुढे म्हणाले की, "मरणांती वैराणी ही आपली संस्कृती आहे. शिवरायांनी अफझलखानाचीही कबर बांधली. अंधाराची पूजा करणारे असतातच", सावंत यांनी उदाहरणे देत, "गोडसेचा उदोउदो करणारेही आहेतच की भाजपमध्ये! त्यांना जेलमध्ये टाकतो का?" असा सवाल देखील त्यांनी भारतीय जनता पक्षाला केला आहे. सोबतच त्यांनी, "ओवेसींचा धर्मांध विचार देशाला माहीत आहे. आम्ही भाजपबरोबर त्यांचाही विरोध करतो. भाजप त्यांचा वापर करते", असे म्हटले आहे.

या दरम्यान शिवसेने या प्रकरणावर इशार देत, "ज्या महाराष्ट्रातील औरंगाबादेत संभाजी महाराजांचा छळ करण्यात आला त्या औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेण्याची गरज काय होती? असा सवाल करत त्यांनी दोन समाजात तणाव निर्माण करण्यासाठी जलील आणि ओवैसी प्रयत्न करत आहेत, वातावरण खराब करत आहेत. दर्ग्यात जाण्यासाठी आम्हाला हरकत नाही पण तुम्ही कबरीवर जाऊन चूक केली आहे. त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे", औरंगबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT