Ajit Pawar and Nana Patole Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: भावी मुख्यमंत्री पदाच्या NCPच्या दाव्यावर नाना पटोले संतापले; दिला इशारा

'मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार' जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

अंकिता खाणे (Ankita Khane)

एकीकडे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच नेत्यांचे पक्षांतर देखील वाढले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले. त्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावरुन रोज नवनव्या चर्चा रंगल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं त्यानंतर जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास व्यक्त केला होता. याच प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री पदावरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, दिवसा कोणाला स्वप्न बघायची असतील तर त्यांना बघू देत, आम्ही काँग्रेस म्हणून महत्वाच्या मुद्द्यांवर सध्या लक्ष देत आहोत. आता लगेच कुठल्या निवडणुका नाहीत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपच्या विरोधात जो जो आहे तो आमचा मित्र आहे ,म्हणून आम्ही एकजुटीने लढत आहोत," असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

त्याचबरोबर महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर बोलताना नाना पटोले म्हणाले कि, "कोण काय करतयं याने आम्हाला काही फरक पडत नाही, कोणी सत्तेसाठी काही निर्णय घेत असतील तर घेऊद्यात आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत".

दरम्यान, आज मुंबईत होणारी वज्रमुठ सभा विराट होईल. सभेला मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत आणि मित्रपक्षांचेही कार्यकते येणार आहेत. तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजची सभा ऐतिहासिक होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT