Nana Patole Sakal
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंचा दावा, ...तर दोन्ही देशमुख पराभूत होतील! शहराध्यक्षांनी केली २ जिल्हाध्यक्षांची मागणी; ‘शहर उत्तर’वरही डोळा

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सोलापूरची जागा जिंकायची आहे. विधानसभेलाही शहर उत्तर व दक्षिण सोलापूरमध्ये यश मिळेल, पण त्यासाठी सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या बैठकीत केली.

तात्या लांडगे

सोलापूर : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सोलापूरची जागा जिंकायची आहे. विधानसभेलाही शहर उत्तर व दक्षिण सोलापूरमध्ये यश मिळेल, पण त्यासाठी सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या बैठकीत केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पुण्यात पार पडली. ही बैठक सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरली. शहराध्यक्ष नरोटेंनी नेहमीच्याच शैलीत प्रास्ताविक करीत प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जिल्ह्याध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, शहराध्यक्ष नरोटे, सुरेश हसापुरे, युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, दक्षिण तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्यासह आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

...तर दोन्ही देशमुख पराभूत होतील

प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, सोलापूर लोकसभा काहीही करून जिंकायची असून सोलापूरसह राज्यातील सध्याचे एकूणच वातावरण पाहता दोन्ही देशमुख पडतील, अशी स्थिती आहे. ज्यांनी चिमणी पाडली, त्यांना आपल्याला पाडायचे आहे. त्यामुळे बूथ यंत्रणा सक्षम करा, पक्ष बांधणीवर विशेष भर द्या, कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून दोन महिन्यांत निर्णय घेवू, असेही त्यांनी सांगितले.

पंढरपूर-मंगळवेढा आपलाच; ‘शहर उत्तर’ही मतदारसंघ हवा

सोलापूरची लोकसभा जिंकायची असल्यास दोन जिल्हाध्यक्ष करावेत. भाजपाने केले, शिवसेनेचेही चार-चार आहेत, मग आपण का करू नये. माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष असावा, जेणेकरून कार्यकर्त्यांना काम करायला वाव मिळेल, असे शहराध्यक्ष नरोटे यांनी स्पष्ट केले. मंगळवेढा हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा तर शहर उत्तर हा आपलाच आहे. त्यामुळे ‘उत्तर’ही हक्काचा राहिल्यास त्या भागात पक्ष मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT