Congress Vijay Wadettiwar says PM modi roadshow in bengluru during ISRO Visit was politically motivated  
महाराष्ट्र बातम्या

PM Modi ISRO Visit : मोदीजी, शास्त्रज्ञांची भेट ठीक, पण रोड शो गरज काय होती? वडेट्टीवारांचा इस्त्रो भेटीवरून सवाल

रोहित कणसे

Mission Chandrayaan 3 : चांद्रायान३ च्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथील इस्त्रोच्या मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. आफ्रिका आणि ग्रीस या देशांचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी आज सकाळी बंगळुर येथे पोहचले. यावेळी त्यांच्यासाठी रोड शो चे आयोजन देखील करण्यात आले होते. दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोवर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी इस्त्रोच्या कार्यालयात पोहचण्या आधी एक भव्य रोड शो आजोजित करण्यात आला होता. तसेच पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली. काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींनी केलेल्या या रोड शोवर आणि त्यांनी केलेल्या घोषणांवर देखील टीका करण्यात आली आहे.

"नामकरण करण्यात भाजप वस्ताद आहे. त्याचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांच्या डोक्यात कायम असतं. पंतप्रधान शास्त्रज्ञांना भेटायला गेले होते, आम्हाला शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, देशाच्या पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना भेटायला हवे, पण त्यांनी रोड शो का केला? चांद्रयानाच्या मागे देखील राजकारण लपलेले आहे का? लपून-छपून यामागे राजकारण असू शकतं.

ज्या वैज्ञानिकांनी त्यांच्या मेहनतीने हे मिशन यशस्वी केले त्यांच्यासोबत हा रोड शो केला असता तर ती अभिमानाची गोष्ट होती. हे अभियान यशस्वी झालं याचा आम्हाला अभिमान आहे, पण पंतप्रधानांचा रोड शो राजकीयदृष्ट्या प्रेरित होता..." अशा शब्दात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय झालं?

भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चांद्रयान ३ चं सॉफ्ट लँडिंग करुन मोठा विक्रम केला होता. ज्या दिवशी ही मोहीम पार पडली, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे हा ऐतिहासिक क्षण पाहिला होता.

यावेळी त्यांनी आपण भारतात आल्यावर पहिल्यांदा इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज सकाळी पंतप्रधान मोदी ग्रीसवरुन थेट बंगळुरूमध्ये दाखल झाले.

मोदींनी काय घोषणा केल्या

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं आहे, त्या ठिकाणाला आता 'शिवशक्ती पॉइंट' म्हटलं जाणार असल्याचं घोषित केलं. यासोबतच, चांद्रयान-2 मधील विक्रम लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं होतं, त्या जागेला 'तिरंगा पॉइंट' म्हटलं जाणार अशी घोषणा देखील त्यांनी केली.

भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून इतिहास रचला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी 23 ऑगस्ट रोजी पार पडली. त्यामुळे, इथून पुढे या दिवसाला 'नॅशनल स्पेस डे', म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरं केलं जाणार असल्याची घोषणा देखील पंतप्रधानांनी केली.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT