exam esakal
महाराष्ट्र बातम्या

Contract recruitment : कंत्राटी भरतीचं टेंडर कोणत्या भाजप आमदाराकडे? जयंत पाटील म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्य शासनाच्या कंत्राटी भरती प्रक्रियेला राज्यामधून विरोध होताना दिसून येत आहे. आज जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावरुन सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तरुणांच्या भविष्याचा आणि कामकाजाच्या जोखिमेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात तिथे कंत्राटी कर्मचारी नेमणं चुकीचं आहे. हे अतिशय गंभीर असून बेभरोशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन कामं करुन घेतली आणि चुका झाल्या तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो.

पाटील पुढे म्हणाले की, हळूहळू आपण सरकारच कंत्राटी पद्धतीने चालवू लागलो आहोत. कंत्राटी भरतीमध्ये धोका असा आहे की नंतर हेच कंत्राटी कर्मचारी संघटना बांधतात आणि आंदोलनं उभी करतात. शिवाय कंत्राटी कामावर गेलेल्या युवकाचं भविष्य कायम अधांतरी असतं.

कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप आमदारांच्या असल्याच्या चर्चा आहेत, त्याबद्दल जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की, हे अतिशय गंभीर असून अशा पद्धतीने जवळच्या लोकांना लाभ करुन देण्यासाठी सरकार काम करत असेल तर चुकीचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidates: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, चार उमेदवारांमध्ये कोणाची नावे?

Nita Ambani : नीता अंबानींची मोठी घोषणा! १ लाखांहून अधिक महिला अन् बालकांसाठी कर्करोग,हृदयविकाराचे मोफत उपचार

आणि रणवीरला सेटवरून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं ; हे होतं कारण

Bandra Stampede: "रेल्वे प्रशासनाची बेफिकिरी जिवावर बेतली..."; वांद्रे चेंगराचींगरी दरम्यान पोलीस काय करत होते?

Sinhagad Accident: सिंहगडावरून व्यक्ती २५० फूट खोल दरीत कोसळला

SCROLL FOR NEXT