मुंबई- देशाचे गृहमंत्री अमित शहा हे विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी अमित शहा व भाजपवर जोरदार टीकेचे झोड उठवली आहे.
'दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अमित शाह यांचा उल्लेख बाजारबुणगे असा केला आणि पवार - ठाकरेंना महाराष्ट्रामधून कुणीच संपवू शकत नाहीत, असंही यांनी ठणकावून सांगितलं आहे.यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे हिंदुत्ववापासून दूर गेले आहेत. काँग्रेसच्या दारात त्यांना कटोरा घेऊन फिरावे लागत आहे. शरद पवार यांच्याकडेही मुख्यमंत्री होण्यासाठी कटोरा घेऊन जात आहेत. इतक्या लाचारीमुळे ठाकरेंना लोकं सोडून जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
अमित भाई आढावा घेत आहेत. पुढील 8 -10 दिवसांत मुंबईत दौरा होईल. पुन्हा नवीन ऊर्जा मिळेल. उद्धव ठाकरेंनी 15 योजना बंद केल्या होत्या. मविआचं एक चुकीचं बटण दाबलं तर सर्व योजना बंद होतील. अमित शहा जिंकण्याची उमेद असलेले नेते आहेत. काँग्रेस आणि जयंत पाटील यांना भीती असते. त्यांना घाबरगुंडी होते म्हणून झोप लागत नाही. जेवढे काही भूकंप व्हायचे होते ते होऊन गेले. त्याचे हादरे विरोधकांना लागतील, असं ते म्हणाले.
कोर्टाला काय वाटलं याबाबत पोलीस उत्तर देतील. पोलिसांनी कृती केली पण विरोधकांनी राजकारण केलं. गुन्हेगारी वृत्तीला बळ देण्याचे काम विरोधक करत आहेत. राजकारण करून काय मिळवायचे आहे. राजकारणाचा स्थर खाली जातोय. कोर्टाला पोलीस अहवाल सादर करतील, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.