Trimbakeshwar Temple Controversy Explained  
महाराष्ट्र बातम्या

Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न कोणी केला अन् त्यांना का रोखलं गेलं?

Trimbakeshwar Mandir News: नाशिक येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर सध्या चर्चेत आहे. या मंदिरात हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असा नियम आहे.

रोहित कणसे

Trimbakeshwar Temple Controversy: नाशिक येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर सध्या चर्चेत आहे. या मंदिरात हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असा नियम आहे.

मात्र १३ मे रोजी रात्री काही तरुणांनी मंदिराचे उत्तर (महाद्वार) दरवाजातून जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर तणाव पसरल्याचं पाहायला मिळालं.

यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामस्थांची कारवाईची मागणी

या प्रकारानंतर सामाजिक सलोखा बिघडू नये, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने त्र्यंबक पोलीस ठाण्यात घडल्या प्रकारा बाबत पत्र दिलं.

सदर घटनेचा तपास करून संबंधीतांवर याग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील मंदिर ट्रस्ट सह ग्रामस्थांकडून करण्यात आली. दरम्यान अशाच प्रकारे पुरोहित संघ, ब्राम्हण महासंघ, मराठा महासंघ यासह सुमारे 15 हिंदुधर्मिय संघटनांनी निवेदन तक्रार अर्ज दिले आहेत.

पण नेमकं झालं काय?

त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला.

या १० ते १२ युवकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथे बंदोबस्तास असलेले एमएसएफ जवानांनी त्यांना रोखले. आपणास आत जाता येणार नाही असे सांगीतले. त्यानंतरही जवळपास १५ मिनेट त्यांची हुज्जत झाली. मात्र अखेर प्रवेश न घेता ते तेथून पुढे निघुन गेले.

मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणारे कोण होते?

मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथे विशिष्ट धर्मातील नागरिकांकडून संदलनिमीत्त दरवर्षी मिरवणूक काढली जाते. ती दरवर्षी ठराविक मार्गानेच जात आली आहे. यादरम्यान यंदाच्या या मिरवणूकीतील काही तरुणांनी मंदिरात बळजबरीने जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना का रोखलं?

त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असा नियम आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ याबद्दल ठळक शब्दात सूचना देखील लिहीण्यात आली आहे.

असे असून देखील मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न झाला. याच कारणामुळे मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न होत असाताना रोखण्यात आलं. तसेच याचमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. (Latest Nashik News)

मंदिराबाहेर लिहीण्यात आलेली सूचना
मंदिराबाहेर लिहीण्यात आलेली सूचना

सरकारची भूमिका काय

राज्य सरकारकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर या प्रकरणात एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे.

तसेच अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीसांनी दिले आहेत.

तसेच गेल्या वर्षी देखील असाच प्रकार झाला होता असे बोलले जात आहे, ही एसआयटी त्या प्रकरणाची देखील चौकशी करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT