सद्य:स्थितीत राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 10,441 झाली असून 1 डिसेंबर रोजी ती संख्या 7,391 होती.
सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या साडेसहा हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, मागील काही दिवसांतच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या साडेदहा हजारांपर्यंत झाली असून दुसरीकडे ओमिक्रॉन (Omicron) हा नवा व्हेरिएंटदेखील आपले पाय घट्ट रोवू लागल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत (27 डिसेंबरपर्यंत) राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा हजार 441 झाली असून 1 डिसेंबर रोजी ती संख्या सात हजार 391 होती. (Corona active patients have increased in eight districts and the speed of omicron is also worrying)
मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palgahr), रायगड (Raigad), पुणे (Pune), सातारा (Satara), नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांमधील रुग्णवाढ अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. कोरोना चाचण्या कमी झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संशयितांच्या चाचण्या वाढविण्याचे निर्देश देऊनही त्याची अजूनपर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बहुतेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरणात व्यस्त आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता खरी ठरतेय की काय, अशी स्थिती ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर 18 वर्षांवरील सर्वांनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह सर्वांनीच केले.
जिल्हानिहाय अॅक्टिव्ह रुग्णवाढ (1 डिसेंबरच्या तुलनेतील 27 डिसेंबरची स्थिती)
जिल्हा : 1 डिसेंबर : 27 डिसेंबर
मुंबई : 1922 : 4765
ठाणे : 1013 : 1397
पालघर : 170 : 301
रायगड : 182 : 268
नाशिक : 352 : 423
सातारा : 99 : 229
जळगाव : 8 : 9
बीड : 39 : 43
नांदेड : 10 : 18
उस्मानाबाद : 4 : 9
अकोला : 16 : 17
बुलढाणा : 7 : 9
नागपूर : 58 : 92
गोंदिया : 2 : 3
गडचिरोली : 3 : 6
एकूण : 3,885 : 7,589
एक कोटी व्यक्तींनी लसच घेतली नाही; 85 लाख व्यक्तींची दुसऱ्या डोसकडे पाठ
राज्यातील 18 वर्षांवरील नऊ कोटी 14 लाख व्यक्तींनी प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचणे अपेक्षित होते. मात्र, 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होऊनही अद्याप राज्यातील एक कोटी दहा लाख व्यक्तींनी एकही डोस घेतलेला नाही. तर चिंतेची बाब म्हणजे जवळपास 85 लाख व्यक्तींनी पहिला डोस घेऊन 84 दिवस होऊनही ते दुसरा डोस घ्यायला आलेले नाहीत. नंदुरबार (Nandurbar), बीड (Beed), नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), धुळे (Dhule), परभणी (Parbhani), लातूर (Latur), अकोला (Akola), जळगाव (Jalgaon), यवतमाळ (Tawatmal), गडचिरोली (Gadchiroli), जालना (Jalna), बुलढाणा (Buldhana), नगर (Nagar), वाशिम (Washim) या जिल्ह्यातील 20 टक्के लोक अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. तर पालघर, ठाणे, सोलापूर (Solapur), औरंगाबाद (Aurangabad), अमरावती (Amravati), नाशिक (Nashik) व उस्मानाबाद (Osmanabad) या जिल्ह्यांमधील 16 ते 19 टक्के व्यक्तींनी एकही डोस घेतलेला नाही.
ठळक बाबी...
कोरोनाच्या दोन्ही लाटेत राज्यातील 66 लाख 59 हजार 314 जणांना होऊन गेला कोरोना
बाधितांपैकी 65 लाख तीन हजार 733 रुग्णांनी केली कोरोनावर मात
दोन्ही लाटेत राज्यातील एक लाख 41 हजार 454 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
4 डिसेंबर रोजी सापडला राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; 27 डिसेंबरपर्यंत आढळले राज्यात 167 रुग्ण
27 डिसेंबरपर्यंत राज्यातील ओमिक्रॉन पॉझिटिव्ह 167 रुग्णांपैकी 72 जणांनी केली त्यावर मात
1 ते 27 डिसेंबर या काळात राज्यात वाढले कोरोनाचे तीन हजार 50 ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.