मुंबई : महाराष्ट्राचा अपमानाचा मुद्दा संजय राऊतसारखा बोलत आहेत. पण राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा राज्य सरकारच्या नाकर्त्यापणामुळे देशात सर्वाधिक कोरोना बळी गेले. महाराष्ट्राचा अपमान तेव्हाच झाला जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी खंडणीचे आरोप आयुक्तांनी केले. राज्याचा अपमान तेव्हा होतो जेव्हा राज्यात गेल्या दोन वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांचा आत्महत्या झाल्या, असा हल्लाबोल भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhey) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) केला आहे. संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरल्याची टीका केली होती. त्यावर सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. (Corona Death Hikes In Country Due To State Government, Said Keshav Upadhye)
आज केलेल्या आपल्या ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात, की राज्य सरकारच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांच भवितव्य अंधारात जात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत असतो. राज्य सरकार राज्यातील जनतेचा अपमान सातत्याने केला. देशातील एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात जनतेला कोणतेही पॅकेज दिले नाही. याबद्दल कधी बोलणार, असा सवाल त्यांनी राऊतांना केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.