Omicron Virus esakal
महाराष्ट्र बातम्या

युगांडाहून परतलेल्या पती-पत्नीसह दोन मुलांचा अहवाल 'पॉझिटिव्ह'

किरण बोळे

युगांडातून नुकतेच पती, पत्नी व त्यांची दोन मुले फलटण येथे परतले आहेत.

फलटण शहर सातारा : युगांडाहून (Uganda) फलटण शहरात परतलेल्या पती, पत्नी व दोन मुलांचा कोरोना चाचणी (Corona Test) अहवाल बाधीत आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधितांचे स्वॅबचे नमुने ओमिक्रॉनच्या (Omicron Virus) टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याचे अहवाल आल्यानंतरच खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.

युगांडा येथून नुकतेच पती, पत्नी व त्यांची दोन मुले फलटण येथे परतले आहेत. सदरची माहिती समजताच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यामध्ये त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील दाट लोकवस्तीच्या भागातच कोरोना बाधित कुटुंब आढळून आल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित कुटुंबातील सर्वांचे स्वॅबचे नमुने ओमिक्रॉनच्या टेस्टसाठी (Omicron Test) पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.

सदर कुटुंबाची युगांडा येथील विमानतळावर (Uganda Airport) केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु, भारतात आल्यानंतर या कुटुंबीयांची कोरोना चाचणी येथील विमानतळावर घेण्यात आली की नाही याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दि. ९ रोजी रात्री सदर कुटुंब फलटण येथे आले होते. याबाबत माहिती प्रशासनास मिळताच काल त्यांची चाचणी घेण्यात आली होती, ती आज पॉझिटिव्ह आली. यानंतर संबंधित कुटुंबीयांचे पुन्हा स्वॅब घेण्यात येवून ते सातारा येथे पाठविण्यात आले आहेत. जर तिथेही ते पॉझिटिव्ह आले, तर ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या तपासणीसाठी ते पुणे येथे पाठविण्यात येतील. त्यामुळे सदर कुटुंबीयांना ओमिक्रॉनची लागण आहे की नाही हे समजायला आठडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सदर कुटुंब गृह विलगीकरणात असून प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

संबंधित कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक काळजी घ्यावी. कुटुंबात, नातलगांमध्ये, शेजारी अथवा परिसरात जर कोणी परदेशातून आले तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनास द्यावी.

-डॉ. शिवाजीराव जगताप, प्रांत अधिकारी, फलटण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT