मुंबई : राज्यात कालच्या तुलनेत आज दिवसभरात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. त्यानुसार, राज्यात आज ९८३० रुग्ण आढळून आले तर ५८९० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागानं याबाबत माहिती दिली. (Corona Update 9830 corona patients registered in state during day)
आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज ९,८३० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तसेच नवीन ५,८९० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ५६,८५,६३६ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या १,३९,९३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाणं ९५.६४ टक्के झालं आहे.
दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात ६६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ७४१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात १४,८०७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
तसेच पुण्यात दिवसभरात २५७ रुग्ण आढळून आले तर २८४ जुन्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज पुण्यात ५८१७ कोरोना चाचण्या पार पडल्या. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात २७०३ रुग्णांवर उपचार सुरु असून ४३७ रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.