मुंबई : कोरोना संसर्गाची आजची आकडेवारी राज्याला मोठा दिलासा देणारी ठरली आहे. कारण राज्यात दिवसभरात नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली तसेच मृत्यूंमध्येही मोठी घट झाली आहे. दिवसभरात ३,७४१ रुग्ण आढळून आले तर ५८ जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.
राज्यातील रुग्णसंख्येय काहीशी कमी झाली असून आज दिवसभरात 3,741 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,60,680 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 51,834 इतकी झाली. तर आज दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून आज 4,696 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,68,112 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.2 टक्के एवढं झालं आहे.
राज्यात मृत्यूचा आकडा बराच कमी झाला असून आज 52 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. रविवारी 131 रुग्ण दगावले होते. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,37,209 इतका झाला आहे. अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर पुणे मंडळात 22 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 14, नाशिक 1, कोल्हापूर 12, लातूर 2, नागपूर 1 मृत्यू नोंदवले गेले.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,38,12,827 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,60,680 (12.01 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,88,489 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,299 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.