राज्यात गेल्या सात दिवसांत कोविड-१९च्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत सहा पटीने वाढ झाली आहे. २३ डिसेंबरपर्यंत १०३ सक्रिय रुग्ण होते, ती संख्या ३० डिसेंबरला ६२० झाली आहे. त्यातील २२ टक्के रुग्ण मुंबईत आहेत.
कोविड चाचण्या आणि पाळत ठेवण्याच्या वाढीमुळे प्रकरणे वाढली आहेत. विशिष्ट ऋतुमध्ये अनेक श्वसन विषाणूंचा प्रादुर्भाव होणे ही स्थिती असामान्य नाही. इन्फ्लुएन्झा श्वासोच्छ्रुासाच्या आजारांना कारणीभूत ठरला आहे.
विशेषतः फ्ल्यूच्या हंगामात याचे प्रमाण अधिक आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरात १३१ रुग्णांची नोंद : राज्यात रविवारी (ता. ३१) १२,०४५ जणांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी १३१ जणांमध्ये कोविडचे निदान झाले.
नवी मुंबईत सर्वाधिक १८ नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ठाणे महापालिकेत १५, मुंबईत १४, रायगडमध्ये ४, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६९३ वर पोहोचली आहे. त्यापैकी ठाण्यात सर्वाधिक १९० सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत १३७, पुण्यात १२६, रायगडमध्ये २७ आणि उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये आहेत.
जेएन.१ कोरोना उपप्रकार मोठा थोका निर्माण करेल, अशी परिस्थिती नाही. ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार तरीही असलेल्या रुग्णांची काळजी घेणे: आवश्यक आहे.
- डॉ. रमण गंगाखेडकर,अध्यक्ष, कोविड टास्क फोर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.