uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

लॉकडाऊन करणार का? उद्धव ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

मुंबई -  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत. गुरुवारी पुणे जिल्ह्यात 9 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले होते. परिस्थिती गंभीर दिसत असल्याने पुण्यामध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले. संपूर्ण लॉकडाऊनला राज्यभरातून विरोध होत आहे. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीने लॉकडाऊनच्या विरोधात भूमिका घेतलीये. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच काही वक्तव्य करणार नसल्याचं म्हटलं आहे. पण, परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. तसेच भविष्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही, असं सूचक वक्तव्य केलंय. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनची शक्यता मी बोलून दाखवली होती. ती शक्यता असूनही टळलेली नाही. मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्या मोठ्या राक्षसाप्रमाणे वाढत आहे. हा राक्षस मागच्या पेक्षा मोठा आहे. शिवाय वेगवेगळ्या रुपामध्ये हे विषाणूचं राक्षण आपल्यासमोर येत आहे. राज्यात लॉकडाऊन करणार का, असा प्रश्न मला विचारला जात आहे. याचं उत्तर मी आता देणार नाही. पण, नागरिकांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी संबोधनाच्या सुरुवातीलाच नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, मी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे. मागे आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलं होतं. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपल्याला कोरोना गेल्यासारखं वाटलं होतं. पण, मार्चपासून तो पुन्हा आपलं डोकं वर काढत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत हा धोका कायम राहणार आहे. कोरोना महामारीमुळे जगाची आर्थिक स्थिती दोलायमान आहे. अशात आपल्या सरकारने चांगला अर्थसंकप्ल सादर केला. महाराष्ट्राच्या विकासाची गती कधीही कमी होणार नाही, असा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला, असंही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Assembly Election 2024 Result : देवेंद्र फडणवीस अभिमन्यू पवारांना मंत्री करणार; औसेकरांना विश्वास

Jalgaon Assembly Election 2024 Result : ब्रेक के बाद...गुलाबरावांची ‘हॅट्ट्रिक’; ‘जळगाव ग्रामीण’मधून 59 हजारांचे मताधिक्य

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू! जाणून घ्या पहिल्या सत्रात कोणाला लागल्या बोली

IPL 2025 Auction Live: मोहम्मद सिराजसाठी बंगळुरूने RTM चा पर्याय नाकारला अन् सिराज गुजरातमध्ये दाखल झाला

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

SCROLL FOR NEXT