Dhananjay Munde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Parli Crime News : परळीच्या खून प्रकरणात रोहित पवारांचं मोठं विधान; ''बोगस मतदान समोर आणलं म्हणून...''

संतोष कानडे

मुंबईः बीडच्या परळीमध्ये परवा झालेल्या खूनाच्या घटनेमध्ये शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते यांचं नाव पुढे आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या अटकेवरुन प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी या घटनेचा संबंध लोकसभा निवडणुकीशी जोडला आहे.

परळीचे बबन गित्ते हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्याशी पैशांच्या कारणावरुन शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर बबन गित्तेंनी त्यांच्यावर गोळी झाडली, असं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

या प्रकरणी शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा गु्न्हा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आलेला आहे. सदरील खुनाची घटना राजकीय वादातून झाल्याचं बोललं जात आहे. रविवारी मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलिस ठाण्यसमोर ठेवून आंदोलन केलं होतं.

दरम्यान, बबन गित्ते यांच्या अटकेवरुन रोहित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा राईट हँड आणि लेफ्ट हँड सगळंकाही चालवतात. त्यांच्या वतीने काही करण्यात आलेलं आहे का ते पाहावं लागेल.

रोहित पवार पुढे म्हणाले की, आमच्या बबन गित्तेंनी परळीमधलं बोगस मतदान समोर आणलं होतं, त्याचा हा राग असू शकतो. धनंजय मुंडेंवर आरोप होतोय की, त्यांचा राईट अँड लेफ्ट हँड काल दिवसभर आंदोलनामध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यांचीही चौकशी करा, अशी माझी मागणी आहे. असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, बबन गित्ते यांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. मोठा लवाजमा घेऊन तब्बल ७०० गाड्या बीडमध्ये नेत त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेच परळीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार असतील, अशी चर्चा होती. परंतु या घटनेनंतर परिस्थिती बदलू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT