Madhukar Zende Sakal
महाराष्ट्र बातम्या

Charles Sobhraj : अख्खं जग शोधत होतं पण बिकीनी किलरला छत्रपतींच्या मावळ्याने दोनदा पकडून दाखवलं

दत्ता लवांडे

जगभरात बिकीनी किलर म्हणून ओळख असलेल्या चार्ल्स सोभराज याची नेपाळ येथून सुटका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळ येथील न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिल्यामुळे तो पुन्हा चर्चेत आलाय. थायलंड, भारत, तुर्कस्तान, इराण अशा नऊ देशांतील ४० ते ४५ पेक्षा जास्त महिलांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर त्याने चार देशात कैदी म्हणून शिक्षा भोगली होती. अख्खं जग शोधात असलेल्या या गुंडाला दोनदा पकडण्याचं काम छत्रपतींच्या मावळ्याने करून दाखवलं होतं. त्याला १९८६ साली गोव्यातून पकडण्यात आलं तेव्हाचा हा किस्सा. (पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी सकाळला या प्रकरणासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत सविस्तर सांगितलं आहे.)

६ एप्रिल १९८६ ची संध्याकाळ. मुंबईतील पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांना चार्ल्स सोबराजच्या येण्याची चाहूल लागली होती. त्यामुळे ते संपूर्ण पोलिसांची टीम घेऊन गोव्यात दाखल झाले. गोव्यातील 'ओ कोकेरो' या आंतरराष्ट्रीय हॉटेलात तो येणार होता. रात्र झाली होती. तो येण्याची वेळ झाली होती. झेंडे आणि त्यांची संपूर्ण फौज त्याचीच वाट पाहत होती. तेवढ्यात दोन व्यक्ती सनहॅट घालून येताना दिसले. एवढ्या रात्री दोन व्यक्ती सनहॅट घालून आलेले झेंडे यांनी पाहिलं. त्यांना संशय आल्यामुळे यांनी निरखून पाहिलं तेव्हा त्यातील एकजण चार्ल्स सोभराज असल्याची त्यांची खात्री झाली आणि ते तसेच लपून बसले.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पोलीस अधिकारी मधुकर झेंडे

चार्ल्स आणि त्याच्यासोबत असलेला व्यक्ती ओ कोकेरा या हॉटेलमध्ये समोरंच एका टेबलवर बसले. झेंडे आणि त्यांच्यासोबत असलेली टीम तयारंच होती. या हॉटेलमध्ये सर्व आधुनिक फोन कॉलचे तंत्रज्ञान असल्यामुळे येथे सर्व परदेशी लोकं फोन लावायला येत असत. त्यामुळे सहसा या ठिकाणी परदेशी लोकांचा सहवास होता. झेंडे बरोबर चार्ल्स यांच्या पाठीमागच्या टेबलवर जाऊन बसले. त्या टेबलवर त्यांनी एका चिठ्ठीवर सगळा प्लॅन केला आणि वेटरकडे ती चिठ्ठी देत आपल्या सहकाऱ्यांपर्यंत मेसेज पाठवला. सगळ्या सहकाऱ्यांना मेसेज गेला अन् सगळ्यांच्या हृदयाची धकधक वाढायला लागली.

मधुकर झेंडे मागच्या टेबलवरून उठले आणि क्षणात मागून चार्ल्स यांची मान घट्ट पकडली अन् त्याला दाबून ठेवलं. तेवढ्यात त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी चार्ल्सकडून पिस्तूल जप्त केलं अन् क्षणात त्या दोघांना अटक केली. महाराष्ट्र पोलिसांनी गोव्यात केलेली ही कामगिरी होती. गोवा पोलिसांना कोणतीही कानोकान खबर पोहचू न देता त्यांनी हा पराक्रम केला होता.

जगभरातील अनेक देशांतील पोलीस मागावर असलेला गुन्हेगार एका मराठी माणसाच्या गनिमी काव्याने मोठ्या शिताफीने पकडला गेला होता. त्यामुळे त्यांची चार्ल्स आणि त्याच्या सहकाऱ्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी लगबग सुरू झाली कारण त्या ठिकाणची माहिती बाहेर पसरली असती तर जगभरात क्षणात संपर्क होऊ शकणाऱ्या हॉटेलमधून काहीही होऊ शकले असते.

Charles Sobraj

या मोहिमेचे कॅप्टन म्हणून झेंडे यांनी मोठी कामगिरी केली होती. त्यांनी काही सहकाऱ्यांसहित चार्ल्स याचे हातपाय बांधून एका गाडीत टाकलं. वेगाने या गाड्या रात्रीच्या अंधारात मुंबईकडे धावू लागल्या. जगातल्या एका कुख्यात गुंडाला पकडल्याचं समाधान झेंडे आणि त्यांच्या टीमच्या चेहऱ्यावर उमटलं होतं.

गोव्याहून मुंबईकडे येताना पोलादपूर जवळ आल्यावर रायगडाचा टोक दिसायला लागतो. तेव्हा झेंडे यांनी रायगडाला मुजरा केला होता. झेंडे म्हणाले की, महाराज तुम्ही दिल्लीत जाऊन औरंगजेबाचं नाक कापलं होतं आणि मी एक साधा मावळा आहे ज्याने एका कुख्यात गुंडाला पकडलं आहे, माझा मुजरा घ्या" असं म्हणत झेंडे यांनी रायगडाला मुजरा केला आणि मुंबईचा रस्ता धरला.

Charles Sobraj

दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दिल्लीच्या तिहार जेलमधून पळालेल्या या गुंडाला घेण्यासाठी दिल्लीतून स्पेशल विमाने आले होते. दुसऱ्या दिवशी अमूलने 'अटकेपार झेंडे' अशा आशयाची आपली जाहिरात मराठीतून छापली होती. ही जाहिरात पाहून झेंडे यांचा सन्मान लता मंगेशकर यांनी केला होता. तर जगातील सर्वांत क्रूर आणि जवळपास नऊ देशांतील पोलीस मागोवा घेत असलेल्या चार्ल्स सोभराज या गुंडाला पकडण्याचं काम छत्रपतींच्या मावळ्याने करून दाखवलं होतं.

(पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी सकाळला या प्रकरणासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत सविस्तर सांगितलं आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT