Sushma Andhare:
डोंबिवली: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठा कट रचल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांचा हा आरोप म्हणजे बालिश वक्तव्य, त्यावर न बोललेलेच बरे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयीचे गुडविल शेअर करण्यासाठी लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी काही वक्तव्य केले जात असलील तर त्याला काही अर्थ नाही, असे अंधारे यांनी कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असताना म्हटले आहे.
भाजपचे नेते कंबोज यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना नेत्या अंधारे म्हणाल्या, मला अशा काही बालिश वक्तव्यांवर फार काही बोलावसं वाटत नाही. दोन टप्प्यांमध्ये मतदानाचे एकूण निरीक्षण आणि विश्लेषण येत आहेत. त्यावरून भाजपच्या हे पक्क लक्षात आल आहे की महाराष्ट्रातील निवडणूक त्यांच्या हातामधून पूर्णतः निसटली आहे. भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेडमधील कंबोज, राणे वगैरे जे लोक आहेत ते अशी बेताल वक्तव्य करत आहेत. ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत. किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामे आहेत वगैरे वगैरे.... जर असं असतं तर मग उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळामध्ये, मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्ता पटलावरून खाली खेचण्यासाठी एवढ मोठ षडयंत्र रचले असते का? त्यामुळे आता फक्त आणि फक्त उद्धव यांचे गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी काही व्यक्तव्य केल जात असेल तर त्याला काही अर्थ नाही.
निवडणूक जिंकण्यासाठी शेरोशायरी कामी येत नाही-
शिंदे यांच्यासोबत सगळेच गेलेले आहेत. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे. निश्चितपणे आमच्यासाठीच राज्यभरातल वातावरण अतिशय चांगल आहे. परंतु हेही तितकच खरं की आता आम्ही थ्री प्लस वन झालो तरी आम्ही जिंकणारे. त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत त्यांनी जे 14-15 नेले त्या 15 पेक्षा किमान 1 तरी जास्त असेल तर ते जिंकतील. ज्या काही जागा ते लढवत आहेत त्यातल्या 4 ते 5 जागा जरी त्यांना टिकवता येत असतील तर ते त्यांनी आधी बघावे. बाकी शेरोशायरी, कविता, श्लोक, अभंग, पोवाडे, गवळणी या सगळ्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत. निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही केलेली काम आणि कामांचा पाढाच कामाला येतो.
इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा आपले स्थान टिकवावे-
महाविकास आघाडीने 18 जागा जिंकल्या तर राजकीय संन्यास घेईल, असे ओपन चॅलेंज आशिष शेलार यांनी केलं आहे. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, मला बाकीच्यांच्या चॅलेंजशी काही घेणं देणं नाही. फक्त शेलार यांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती. ती जागा त्यांना आता परत मिळावी. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्कटदाबी करू नये. एवढीच माझी अपेक्षा आहे. इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा इतरांच चॅलेंज सांभाळण्यापेक्षा सध्या शेलार आपले स्थान टिकवू शकतात की नाही यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट कराव. बाकी आमचं काय ते आम्ही बघू असे अंधारे म्हणाल्या.
ते त्यांची टाळी वाजवत आहेत-
उद्धव ठाकरे हे सत्तेत असते तर असे बोलले असते का?, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, आमच्या गावाकडे एक म्हण आहे ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी. त्यामुळे आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे. आपण टाळ्या ऐकूया हरकत नाही.
पक्ष प्रमुखाचा निर्णय अंतिम, निश्चितपणे उत्तर मिळेल -
कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर त्या पाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी व माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोघांचेही अर्ज वैध झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. ऐनवेळी उमेदवार बदलणार असल्याची देखील चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी बॅकअपला एक फॉर्म भरलेला असतो. बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काही अलबेल नाही. काहीतरी वेगळी गोष्ट असेल, असं समजायचं कारण नाही. शिवसेनेमध्ये अंतिम शब्द पक्षप्रमुख यांचा असतो. पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आमचं काम आहे. निश्चितपणे तुम्हाला उद्या ही सगळी उत्तरं मिळतील, ज्या अर्थी मी इथे आहे एवढा वेळ काढून आली आहे, मी आजही असणार मी उद्याही असणार आहे. उद्या निश्चितपणे याची उत्तर मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.