crop insurance scheme sakal
महाराष्ट्र बातम्या

Crop Insurance : ‘आधार’अभावी पावणेदोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात अडचणी

बॅंक खात्याशी वैयक्तिक आधार क्रमांक संलग्न करून घेण्याबाबत वारंवार आग्रह धरल्यानंतर देखील काही विमाधारकांनी दुर्लक्ष केले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पुणे - बॅंक खात्याशी वैयक्तिक आधार क्रमांक संलग्न करून घेण्याबाबत वारंवार आग्रह धरल्यानंतर देखील काही विमाधारकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे पावणेदोन लाख शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई मंजूर असली, तरी प्रत्यक्षात रक्कम वितरणात बॅंका असमर्थ ठरल्या आहेत.

पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप २०२३ हंगामात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ या घटकाखाली दिल्या जाणाऱ्या विमा भरपाईचे नियोजन आटोपले आहे. 'कृषी विभागाने केंद्र व राज्याकडे पाठपुरावा केल्यामुळे जवळपास ५२.७३ लाख शेतकऱ्यांना २३३० कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर केली आहे. जानेवारीअखेर यातील ४९.५८ लाख शेतकऱ्यांना २२४३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत' अशी माहिती सूत्रांनी दिली.

'पावणेदोन लाख शेतकऱ्यांची विमा भरपाईची रक्कम बाजूला काढून ठेवण्यात आलेली आहे. ‘आधार’अभावी बॅंकांना ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष वर्ग करता आलेली नाही. परंतु शेतकरी आपापली खाती आधारशी संलग्न करतील; त्यापाठोपाठ या रकमादेखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होत जातील,' अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, राज्यातील आणखी १.३३ लाख शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम मिळालेली नाही. कारण या शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे. शासनाच्या धोरणानुसार, कोणत्याही शेतकऱ्याला एक हजारापेक्षा कमी भरपाई देता येत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत वेगळे नियोजन सुरू आहे.

'राज्यात ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ घटकाखाली दिल्या जाणाऱ्या भरपाईची रक्कम एक हजार रुपयांखाली असलेल्या शेतकऱ्यांबाबत नैसर्गिक आपत्ती, पीक कापणी प्रयोग अशा दोन घटकांमधून किती रक्कम मिळते ते तपासले जाईल.

ही रक्कम एक हजारापेक्षा अधिक येताच संबंधित शेतकऱ्यांना भरपाई दिली होईल. मात्र तीन घटकांची मिळून ही रक्कम पुन्हा एक हजाराच्या खाली येत असल्यास शासन त्यात अजून निधी टाकून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे भरपाई वर्ग करेल,' असे सूत्रांनी स्पष्ट केले.

विमा भरपाई वितरण स्थिती

  • जानेवारीअखेर ४९.५८ लाख शेतकऱ्यांना २२४३ कोटी रुपये वितरित

  • ३.१५ लाख शेतकऱ्यांना ८७ कोटी रुपयांचे वितरण बाकी

  • १.७३ शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक आधारशी संलग्न नाही

  • एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा भरपाईची रक्कम असलेल्या यादीत १.३३ लाख शेतकरी. त्यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन सुरू

  • ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’खाली ३.९६ लाख शेतकऱ्यांना मिळाली भरपाई

  • पेरणी करण्याइतपत पाऊस न झालेल्या घटकाखाली २९ हजार ५४१ शेतकऱ्यांना दिली ११.४१ कोटींची भरपाई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT