Crops will survive for 2 months without water jalgaon news 
महाराष्ट्र बातम्या

Jalgaon Agriculture News : पाण्याशिवाय दोन महिने पिके तग धरणार! ब्राह्मणशेवग्याच्या शेतकरी पुत्राचे संशोधन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : शेतात पिकांची लागवड केल्यानंतर दोन महिने पाऊस झाला नाही तरी स्टार्च मटेरियलच्या (मक्याची पावडर) माध्यमातून पिके तग धरुन उभे राहू शकतात, असे संशोधन ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) येथील शेतकरीपुत्र प्रकाश पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे, या संशोधनाला शासनाचे पेटंट प्राप्त झाले असून २० वर्षांसाठी त्यांना एकाधिकार देखील प्राप्त झाले आहेत.

बी. ई. मेकॅनिकल असलेले प्रकाश पवार यांनी केलेले संशोधन शेतीसाठी क्रांतिकारी ठरेल असा विश्‍वास स्वतः पवार यांनी व्यक्त केला आहे. (Crops will survive for 2 months without water jalgaon news)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

पाण्याची साठवण क्षमता वाढवणारा जैविक फॉर्म्युला त्यांनी तयार केला आहे. त्याचे टेस्टिंग सुरवातीला त्यांनी प्रयोगशाळेत केले. त्यात शंभर टक्के रिझल्ट मिळाल्यानंतर प्रत्यक्ष शेतात त्यांनी त्याचा वापर करून पाहिला.

एवढेच नव्हे तर वन विभागाच्या सुकलेल्या झाडांवर हा प्रयोग केला असता, ही झाडे एक- दीड महिन्यातच हिरवीगार झाली. दुष्काळामुळे तसेच पाण्याच्या अभावी पिकांचे जे नुकसान होते, ते प्रकाश पवार यांच्या प्रयोगामुळे टाळता येणार आहे.

पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात कपाशी किंवा कुठल्याही फळभाज्या किंवा नगदी पिकांची लागवड करताना त्यांनी तयार केलेली पावडर अगोदर टाकावी.

त्यानंतर त्यावर बी पेरल्यानंतर दोन महिने पाणी देण्याची गरज नाही.

दोन महिन्यानंतर अगदी थोडे जरी पाणी पिकांना मिळाले तरी चालते. हा फॉर्म्युला जैविक असल्याने तो आपोआप जमिनीत विघटित होतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्याचा दावा देखील पवार यांनी आपल्या संशोधनासंदर्भात केला आहे.

पवार यांनी पाश्चात्त्य देशांमध्ये मिळणाऱ्या मोठमोठ्या पॅकेजला बळी न पडता, शेतकऱ्यांसाठी या संशोधनात त्यांनी स्वतःला झोकून देत त्यात यश मिळवले आहे. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठीच त्यांचे हे संशोधन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT