Cyrus Mistry  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Cyrus Mistry Death : कार चालवणाऱ्या अनाहिता पांडोळेंविरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

Cyrus Mistry Accident : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आता याप्रकरणी पोलिसांनी घटनेवेळी कार चालवणाऱ्या अनाहिता पांडोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी कासा पोलिसांनी घटनेवेळी गाडी चालवणाऱ्या अनाहिता पांडोळे यांच्याविरुद्ध कलम ३०४ (अ), २७९, ३३६, ३३८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अनाहिता यांचे पती दारियस पांडोळे याचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असल्याचे पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाहिता पांडोळे यांच्यावर सध्या रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. ४ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील एका पुलावर अपघात झाला होता. त्यावेळी डॉ.अनाहिता पांडोळे या गाडी चालवत होत्या. याघटनेत अनाहिता आणि त्यांचे पती दारियस पांडोले गंभीर जखमी झाले होते. तर सायरस मिस्त्रीयांच्यासह दोघांचा मृत्यू झाला होता.

जबाबात नेमकं काय?

अनाहिता यांचे पती पंडोळे यांनी घटनेबाबत पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, डॉ. अनाहिता तिसर्‍या लेनमधून गाडी चालवत होत्या. त्यावेळी समोरील गाडी अचानक तिसर्‍या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये गेली, यादरम्यान त्यांच्या पत्नीनेही कार दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या लेनमध्ये समोर ट्रक आल्याने गाडी दुसऱ्या लेनमध्ये नेता आली नाही. लेन आणि त्यावेळी रेलिंगला गाडीची जोरदार धडक होऊन भीषण आपघात झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्यात राज ठाकरे सभा घेणार

TET Exam : टीईटी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर; डमी उमेदवारी रोखण्यासाठी फेस रीडिंग यंत्र बसविणार

Starlink India: इलॉन मस्क यांचं स्टारलिंक भारतात इंटरनेट क्षेत्रात करणार धमाका? ट्रम्प यांच्यासह भारत सरकारचे संकेत

DY Chandrachud: आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चंद्रचूडांच्या पिठासमोर होण्याची शक्यता मावळली, आता...

"आम्हाला कधीच मूल नको हवं होतं" लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्रीच्या दाव्याने सगळ्यांना बसला धक्का ; म्हणाली...

SCROLL FOR NEXT