dam water level 55 percent dam water storage in maharashtra monsoon rain weather agriculture  esakal
महाराष्ट्र बातम्या

Dam Water Level : राज्यातील धरणांत ५५ टक्के साठा; शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता दूर

राज्यातील २६ धरणांपैकी २० धरणांतील पाणीसाठा ५५ टक्क्यांवर पोचला

सकाळ वृत्तसेवा

Dam Water Level : पावसाळा सुरू होऊनही ओढ दिलेल्या पावसाने आठ जुलैनंतर राज्यभर हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील २६ धरणांपैकी २० धरणांतील पाणीसाठा ५५ टक्क्यांवर पोचला आहे. कळीमोडी हे एकमेव धरण १०० टक्के भरले असून, पाच धरणे ९० टक्क्यांवर आहेत. त्यामुळे पाणीटंचाई आणि पेरणी व दुबार पेरणीची चिंता दूर झाली आहे.

राज्यातील २६ धरणांपैकी सोलापूर जिल्ह्यातील उजनीच फक्त उणे दहा टक्क्यांवर आहे. दौंडवरून १४ ते १६ हजारांचा विसर्ग धरणात येत असल्याने पुढील आठवड्यात धरण अधिकमध्ये येईल. येडगाव, वडज, डिंभे,

चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर ही धरणे ५० ते ९८ टक्के भरली आहेत.

दुसरीकडे नाझरे, विसापूर, घोड, पिंपळगाव जोगे ही धरणे अजूनही दहा टक्क्यांपुढे गेलेली नाहीत. माणिकडोह धरण ४० टक्के भरले आहे. आणखी दोन-अडीच महिने पावसाळा असल्याने धरणातून एकदम पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणीसाठ्यावर दररोज देखरेख ठेवण्याच्या सूचना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने भीमा खोरे पूरनियंत्रण (जलसंपदा) विभागाला केल्या आहेत. जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी धरणातील पाणीपातळीची माहिती दररोज मागवित आहेत.

दिवसभरात...

  • विदर्भाच्या अन्य भागांमध्ये जोर ओसरला

  • गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस

  • सिरोंचा तालुक्यात ३३४ नागरिकांना हलविले

  • अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे उघडले

  • वर्धा, इरई नदीकाठावरील गावांना फटका

  • इरई धरणाचे तीन दरवाजे एक मीटरने उघडले

  • गोसीखुर्द धरणातूनसुद्धा पाण्याचा मोठा विसर्ग

  • चंद्रपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी

  • आक्सापूर-पोंभुर्णा मार्गावर नाल्यात वाहन वाहून गेले

चंद्रपूर जलमय

विदर्भात पावसाचा जोर कायम असून मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्ते आणि वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. येथील इरई धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा नदीही काठ सोडून वाहत असल्याने अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करावे लागले आहेत.

चंद्रपूरमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून त्यात पुराच्या पाण्याची भर पडल्याने अनेक वस्त्या पाण्याने वेढल्या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरातील सामानांचे मोठे नुकसान झाले आहे.

५० टक्क्यांवर भरलेली धरणे

धरण -पाण्याची टक्केवारी

कळमोडी -१००

खडकवासला -९८.५३

चासकमान -९०.३१

येडगाव -८३.७३

वडज -५३.४९

डिंभे -५८.२४

चिल्हेवाडी -७९.१६

भामा आसखेड -६९.०६

वडिवळे -८६.९०

आंद्रा -७८.८२

पवना -७७.९२

मुळशी -७२.२७

टेमघर -५२.०३

वरसगाव -६९.३७

पानशेत -७६.७१

गुंजवणी -६५.१३

नीरा देवधर- ७९.०७

भाटघर -६३.१६

वीर -७२.५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT