Pravin Darekar  sakal media
महाराष्ट्र बातम्या

दरेकरांच्या अडचणीत वाढ? मुंबई पोलिसांकडून गंभीर आरोप

प्रवीण दरेकर यांनी कामगार असल्याचे सांगून कामगार सहकारी संस्थेकडून 25,000 रुपये मोबदला घेतला, असे मुंबई पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांनी कामगार असल्याचे सांगून कामगार सहकारी संस्थेकडून 25,000 रुपये मोबदला घेतला, असे मुंबई पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. दरेकर यांनी गेल्या आठवड्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असताना पोलिसांनी त्यांचे विशेष सरकारी वकील यांच्यामार्फत सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावर जबाब नोंदवला. (Darekar become member of coop society by falsely claiming to be a labourer, Mumbai Police said to court)

नुकतीच दरेकर यांच्यावर फसवणुकीसह अन्य आरोपांची तक्रार दाखल करण्यात आली. गेल्या आठवड्यात न्यायालयाने दरेकरांना सोमवारपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यांच्या या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत दिलासा दिलाय. दरेकर यांनी कामगार सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी मजूर असल्याचा खोटा दावा केला असल्याचेही वकिलांनी कोर्टात सांगितले. दरेकर यांच्याकडे उपजीविकेचे अन्य साधन असतानाही त्यांनी मजूर असल्याचा चुकीचा दावा केल्याचे वकिलांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. या जोरावर ते मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होण्यासाठी रिंगणात उतरले आणि त्यांना चार लाखांहून अधिक मानधन मिळाले, असेही वकिलांनी म्हटले.

वकिलांनी उत्तरात म्हटले आहे की, दरेकर हे कामगार असल्याचा दावा करून १९९९ मध्ये कामगार सहकारी संस्थेचे सदस्य झाले. 2016 मध्ये विधानपरिषद निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 2.5 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासह 91 लाख रुपयांची रोख असल्याचे दिसून आले आहे. यावरून ते मजूर नसल्याचे दिसून येते.

दरेकर यांनी असा दावा केला आहे की, नंतर आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेल्या व्यक्तीला सोसायटीच्या सदस्यत्वातून काढून टाकण्याबाबत कोणतेही नियम नाहीत तर यावर उत्तरात म्हणण्यात आले आहे की नियमानुसार मजुराची व्याख्या शारीरिक श्रम करणारा आहे मात्र दरेकरांनी याची दखल घेतली नाही. त्यांनी स्वईच्छेने याबद्दल माहिती दिली नाही किंवा त्यांना काढूनसुध्दा टाकण्यात आले नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरच त्यांनी राजीनामा दिला, असेही याचिकेत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT