Dasara melava at shivaji park Eknath Shinde group will go to Supreme Court against decision of High Court  sakal
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava : शिंदे गट ठोठावणार सुप्रीम कोर्टाचा दरवाजा! HC च्या निर्णयावर नाराजी

रोहित कणसे

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघडी सरकार कोसळलं तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आजही सुरूच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. तर उद्धव ठाकरेंना या मेळाव्यासठी परवाणगी देण्यात आली आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात शिंदे गटाकडून सर्वेच्च न्यायालयात दाद मागीतली जाणार असल्याची माहिती शिंदे गटाचे वकील उत्सव त्रिवेदी यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे गटाचे वकील उत्सव त्रिवेदी यांनी उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाचा हा निर्णय चूकीचा असून ही परवानगी अनिल देसाई यांनी देण्यात आली आहे आणि अनिल देसाई हे खऱ्या शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. ते पुढे म्हणाले की, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे परवाणगी ही आम्हाला मिळाली पाहिजे असे त्यांनी सांगितली. सुप्रीम कोर्टात खरी शिवसेना ही शिंदे यांची असल्याचे सांगितले जाईल, असेही ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टात कधीपर्यंत सुनावणी होईल याबद्दल बोलताना त्रिवेदी म्हणाले की सोमवारपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी पुर्ण होईल यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच या मेळाव्यावर स्टे आणून आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवाणगी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दसरा मेळाव्यासंदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आणि हा निर्णय किती दिवसांत येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT