eknath shinde1 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली छत्रपतींची शपथ; जरांगे प्रतिक्रिया देताना म्हणाले, आता त्यांनी...

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण मध्येच थांबवून व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करुन मराठा आरक्षणाची ग्वाही दिली. त्यांच्या या कृतीवर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Dasara Melava CM Eknath Shinde took Shivaji Maharaj Oath for Maratha Reservation Manoj Jarange gives comment)

...तर आम्हाला मान्यच नाही - जरांगे

जरांगे म्हणाले, आता त्यांनी छत्रपतींची शपथ वाहिली असेल तर ही समाजाच्या दृष्टीनं चांगली बाब आहे. परंतू आमचं हक्काचं आरक्षण आहे ते पाहिजे. जर तुम्ही ५० टक्क्यांच्यावर देणार असेल तर ते आम्हाला मान्यचं नाही कारण ते टिकतचं नाही. किती दिवस माझ्या मराठा जातीवर तुम्ही अन्याय करणार आहात. (Marathi Tajya Batmya)

रात्रीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं

मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर मराठा समाजाचा आक्षेप असण्याचं कारण नाही पण आम्ही तुम्हाला आणखी किती वेळ द्यायचा? आम्ही सर्व निकष पार केलेले आहेत. त्यामुळं आमच्या हक्काचं आम्हाला पाहिजे.

माझ्या मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा सन्मान केला आता त्यांनी आमचा आरक्षण देऊन सन्मान करावा. आजची रात्र त्यांच्या हातात आहे त्यांनी रात्रीतून समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही लढायला उद्यापासून सज्ज झालो आहोत, अशा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

मराठा समाज ओबीसीतच

दरम्यान जरांगे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी बरोबर म्हटलंय की आम्हाला ओबीसींचं काढून नकोच. परंतू मंडल कमिशननं कायदेशीरित्या जे आरक्षण दिलंय ते आम्हाला द्या. उर्वरित आहे ते मराठा समाजाचं आरक्षण आहे. पूर्वीपासून मराठा समाज ओबीसीत आहे पण कोणी मान्य करत नव्हतं. तुम्ही कितीही आश्वासनं दिली तरी मी आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिकाही यावेळी मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT