शिंदे गट आणि शिवसेना हे दोन्ही गट दसऱ्याची जय्यत तयारी करत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, शिंदे गट दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी केला आहे.(Dasara Melava Mp Krupal Tumane Shivsena Uddhav Thackeray Bkc Shivaji Park maharashtra politics crisis )
शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती तुमाणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तुमाणे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्याचे ५० आमदार आणि १२ खासदार सोबत आहेत. आज दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. अशी माहिती तुमाणे यांनी यावेळी दिली.
तसेच, शिंदेसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
यासोबतच, मी गेल्या अनेक वर्षांपासून मोहन भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. हिंदूंचं रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांचे विचार ऐकून पुढे जावं यासाठी येत असतो. याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो.
पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील. राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळालं असल्याचेही तुमाणे म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.