Datta Jayanti : आपल्या भारतात पुरातन मंदिर आणि मठांचा खूप मोठा इतिहास आहे; शिवाय त्याच्या अनेक परंपरा सुद्धा आहेत. शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेली परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने सुरू असताना आपण अनेक ठिकाणी बघतो. अशीच एक प्रथा ही कोल्हापुरात अगदी श्रद्धेने पाळली जाते, ती म्हणजे 126 वर्षापासून अखंड वाजणारी वीणा.Datta Jayanti
श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज हे दत्तसंप्रदायातील एक थोर सत्पुरुष मानले जातात. सांप्रदायिक श्रद्धेनुसार ते खुद्द दत्तगुरूंचा एक अवतार मानले जातात. कोल्हापुरातल्या कुंभार आळीत (गल्लीत) प्रामुख्याने राहिल्यामुळे त्यांना कुंभारस्वामी म्हणूनही ओळखल जात.
काय आहे इतिहास?
कोल्हापूर मधल्या नांदणी या गावी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे लहानपणीचे नाव श्रीकृष्ण होते. असं म्हणतात की, त्यांच्या कुलदैवत खंडोबांनी त्यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांकडे जाण्याची आज्ञा केलेली. त्यांच्या आज्ञेने ते अक्कलकोटला जाऊन राहिले आणि काही दिवसांनी स्वामी समर्थांनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला परतण्याची आज्ञा केली.
कोल्हापूरला परत आल्यावर महाराज कुंभार आळीत ताराबाई शिर्के यांच्याकडे राहत होते. असं म्हणतात की ज्यांना षडरिपू स्पर्शू नाही शकले ते संतपुरुष आणि इतरही लोकांना या षडरिपूंपासून दूर ठेवण्याच कार्य संत करत असतात. कोल्हापुरात महाराजांनी तेच केले. या कुंभारआळीतल्या महाराज राहत होते त्या ठिकाणाला वैराग्य मठ अस म्हणतात.
20 ऑगस्ट, 1900 रोजी पहाटे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज वैराग्यमठात समाधीस्त झालेले. महाराजांनी ते हयात असतांनाच आपल्या भक्तांच्या भजनासाठी गंगावेस इथे आपल्या एका अनुयायी व्यासातर्फे, दूसरा मठ बांधून घेतला. या मठाला निजबोध मठ म्हणून आणि व्यासाने बांधली म्हणून व्यास मठ म्हणून ओळखले जाते. महाराजांचे संपूर्ण चरित्र, त्यांचे शिष्य गणेश नारायण मुजुमदार 'श्रीकृष्ण विजय' या नावाने लिहिले आहे.
मठाची रचना
मठामध्ये प्रवेश करताच समोर सभामंडप दिसतो पुढे चौथाऱ्यावर गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या समोर यंत्र आणि दोन्ही बाजूला गरुड आणि मारुती रायाच्या मुर्त्या आहे. आतमध्ये श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराजांची सिंहासनावर विराजमान अशी पंचधातूंची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या मागे मठाच्या कार्यक्रमांच्या साठी एक छोटा सांस्कृतिक हॉल आहे.
अखंड सुरू असते वीणावादन
या मठात अखंड वाजणारी विणा ही या मठाचे मुख्य आकर्षण आहे. ही विणा आजवर कधीच खाली ठेवण्यात आलेली नाही. भाविकांची अशी श्रद्धा आहे की श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज स्वतः विणेच्या झंकरामध्ये आहे.” गेली 126 वर्ष रात्रंदिवस या विणेची इथे सेवा सुरू असते.
नोंदणी केलेल्यांनाच ही सेवा करण्याची संधी मिळते. विणेची देखभाल आणि दुरुस्ती देखील नियमित केली जाते. त्यामुळे रात्रंदिवस अखंड या विणेचे वंदन सुरू असते. . सोबतच रोज संध्याकाळी 7.30 ते रात्री 8.30 दरम्यान इथे अखंड भजन सुरू असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.