maharashtra police sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारकडून 109 डीसीपी, एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र पोलीस खात्यात नवे सरकार आल्यानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात येत आहे. याचाच भाग राज्यातील पोलिस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या 109 अधिकाऱ्यांच्या बदल्या.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र पोलीस खात्यात नवे सरकार आल्यानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात येत आहे. याचाच भाग राज्यातील पोलिस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या 109 अधिकाऱ्यांच्या बदल्या.

मुंबई - महाराष्ट्र पोलीस खात्यात नवे सरकार आल्यानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात येत आहे. याचाच भाग राज्यातील पोलिस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या 109 अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदस्थापनेचे आदेश सोमवार 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत. यामध्ये 109 पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने 109 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या आदेशात मुंबई पोलीस दलात 14 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी सुद्धा आहे.

मुंबई पोलीस दलात बदल

गृह विभागाने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मुंबई पोलीस दलात किमान 14 पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयपीएस अधिकारी अभिनव देशमुख, एम रामकुमार, अनिल पारसकर, मनोज पाटील, अमोघ गावकर, तेजस्वी सातपुते आणि गौरव सिंग यांची मुंबई पोलिसांत बदली करण्यात आली आहे. प्रवीण मुंढे, दीक्षित गेडाम, मंगेश शिंदे, अजय बन्सल, मोहित गर्ग, पुरुषोत्तम कराड यांचाही आदेशानुसार मुंबई पोलिसात बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वादग्रस्त अधिकारी पठाणांचा कमबॅक

पोलीस उपायुक्त अकबर पठाण हेही मुंबई पोलिस दलात परतले आहेत. एका बिल्डरने दाखल केलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनने पठाण, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग, इतर चार पोलिस अधिकारी आणि इतर दोघांविरुद्ध खंडणी व इतर आरोपांसाठी गुन्हा दाखल केला होता. पठाण यांची नाशिक येथील पोलिसांच्या नागरी हक्क प्रतिबंधक विभागात (पीसीआर) बदली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT