Siddhant Patil Found Dead  esakal
महाराष्ट्र बातम्या

Siddhant Patil: "अथक प्रयत्न केल्यानंतरही..."; अमेरिकेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्र पुत्राचा मृत्यू, फडणवीसही गहिवरले

Siddhant Patil Found Dead in America: सिद्धांत पाटील यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर महाराष्ट्र सरकारने बाह्य व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून अमेरिकन अधिकाऱ्यांकडून शोधकार्याला गती देण्याची विनंती केली होती. यानंतर आता शोधकार्य संपुष्टात आले आहे.

Sandip Kapde

अमेरिकेतील मोंटेना राज्यातील ग्लॅशिअर नॅशनल पार्कमध्ये वाहून गेलेल्या भारतीय तरुणाचा मृतदेह जवळपास महिन्याभराच्या अथक प्रयत्नांनंतर सापडला आहे. महाराष्ट्रातील सिद्धांत पाटील यांचा मृतदेह सापडला असून, यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धांत पाटील, जो कॅलिफोर्नियामध्ये काम करत होता, ६ जुलै २०२४ रोजी एव्हालेन्श क्रीकवरच्या ट्रेलवर हायकिंग करत असताना मोठ्या पाषाणावर उभा होता. त्यावेळी तो अचानक पाण्यात पडला आणि वाहून गेला. त्याच्या मित्रांनी त्याला पाण्याखाली जाताना पाहिले होते, परंतु त्याला वाचवता आले नाही.

मृतदेह सापडला-

ग्लॅशिअर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिद्धांत पाटील यांचा मृतदेह एका महिने शोधण्या नंतर सापडला. "सिद्धांत पाटील यांचा मृतदेह ६ जुलै रोजी एव्हालेन्श क्रीकवर गेला होता आणि त्याचा मृतदेह आज सापडला आहे," असे पार्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

फडणवीसांची प्रतिक्रिया-

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. "सिद्धांत पाटील यांच्या मृत्यूने आम्हाला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात देव हिम्मत देवो,  कॅलिफोर्नियातील ॲव्हलांच क्रीक येथे हायकिंग करताना सिद्धांत बेपत्ता झाला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही अथक प्रयत्न केल्यानंतरही त्याला वाचवू शकलो नाही", असे फडणवीसांनी सांगितले.

सिद्धांत पाटील यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर महाराष्ट्र सरकारने बाह्य व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून अमेरिकन अधिकाऱ्यांकडून शोधकार्याला गती देण्याची विनंती केली होती. यानंतर आता शोधकार्य संपुष्टात आले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

सिद्धार्थ 6 जुलै रोजी एव्हलान्च लेकजवळ ट्रेकसाठी गेला होता. ॲव्हलांच क्रीक येथे एका मोठ्या दगडावर उभा असताना तो खाली कोसळला आणि थेट दरीमधील नदीत पडला. सिद्धार्थच्या मित्रांना तो खाली पडल्यानंतरही दिसत होता. तो पाण्यात पडल्यानंतर एकदा वर आला, मात्र नदीच्या काठावर पोहोचण्याआधीच वेगवान प्रवाहामुळे तो वाहून गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT