मुंबई : जगभरातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदरात घट होत असतांना देशासह राज्यातील मृत्युदर मात्र वाढतांना दिसतोय. देशातील मृत्युदर 3.23 वर तर राज्यातील मृत्युदर 4.67 वर पोचला आहे. देशातील मृत्युदर 0.43 तर राज्यातील मृत्यूदरात 1.21 ने वाढ झाली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आठवड्याभरपूर्वी जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 62 लाख 8 हजार 771 इतका होता, तर मृत्युदर 6.4 इतका होता. आठवड्याभरात रुग्णसंख्येत वाढ होऊन तो 85 लाख 25 हजार 042 वर पोचला आहे. तर मृत्युदर 5.36 इतका आहे. जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 23 लाखांनी वाढला असला तरी मृत्यूदरात घट झाल्याचे दिसते. जगभरातील मृत्युदर 0.68 ने घटला आहे. जगभरात कोरोनामुळे चार लाख 63 हजार 244 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आठवड्याभरपूर्वी देशातील कोरोना रुग्णसंख्या ही दोन लाख 16 हजार 919 होती. तर मृत्युदर 2.80 इतका होता. आठवड्याभरात रुग्णांच्या संख्येत साधारणता दोन लाखांची भर पडून ती चार लाख 10 हजार 461 इतकी झाली आहे. तर मृत्युदरात वाढ होत तो 3.23 इतका झाला आहे. मृत्यूदरात 0.43 ने वाढ झाली आहे. देशभरात कोरोनामुळे 13 हजार 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात 6 हजार 144 रुग्णांचा मृत्यू
आठवड्याभरापूर्वी राज्यातील कोरोना रुग्णसंख्या ही 74 हजार 860 होती, तर मृत्युदर 3.46 इतका होता. आठवड्याभरात रुग्णांच्या संख्येत साधारणता 63 हजारांची भर पडून ती एक लाख 28 हजार 205 इतकी झाली आहे. तर मृत्युदरात वाढ होत तो 4.67 इतका झाला आहे. मृत्यूदरात 1.21 ने वाढ झाली आहे. राज्यात कोरोनामुळे सहा हजार 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.