The Death of a Tiger in a battle of Habitat 
महाराष्ट्र बातम्या

अधिवासाच्या लढाईत वाघाचा मृत्यू, गेल्या नऊ महिन्यांत राज्यात तब्बल एवढे मृत्यू 

राजेश रामपूरकर

नागपूर ः उमरेड-कऱ्हाडला-पवनी अभयारण्यातील कुही परिक्षेत्रामध्ये एका वाघाचा मृत्यू आपसातील लढाईत झाल्याचे प्राथमिक अहवालातून उघडकीस आले आहे. शवविच्छेदनात मृत झालेल्या वाघाच्या अंगावर जखमांच्या खुणा आढळून आल्याने हा निष्कर्ष काढण्यात येत आहे. आत्तापर्यंत गेल्या आठ महिन्यांत १४ वाघांचा मृत्यू विविध कारणांमुळे झालेला आहे. 

उमरेड -पवनी - कऱ्हाडला अभयारण्यातील कुही परिक्षेत्रातील वनखंड क्र. 365 मध्ये एका वाघाचा मृतदेह नियमित गस्तीदरम्यान शनिवारी (ता. १२) सायंकाळी वन कर्मचाऱ्यांना आढळला होता. जंगलात अंधार झाल्याने त्या वाघाचे शवविच्छेदन रविवारी सकाळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात आले. याकरिता डॉ. चेतन पातोन्ड, डॉ. सैय्यद बिलाल, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. इलाही तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी अनिल दशहरे, मुख्य वन्यजीव संरक्षकांचे प्रतिनिधी रोहित कारू, विभागीय वन अधिकारी, बोर, तसेच क्षेत्र संचालक पेंच हे उपस्थित होते. 

अंगावर जखमांच्या खाणाखुणा 

हा वाघ टी १७ या वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी दोन वर्षांचा नर असल्याचे आढळून आले. शवविच्छेदनादरम्यान अंगावर जखमांच्या खाणाखुणा आढळून आल्या आहेत. याशिवाय इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अनुषंगाने या वाघाचा मृत्यू आपसातल्या लढाईत झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. या भागात अलीकडेच ब्रम्हपुरी येथील टी २२ या प्रौढ वाघाचे आगमन झालेले आहे असे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प यांनी कळविले आहे. 
 

मानवी हस्तक्षेप व्हावा कमी 

वाघांची संख्या वाढत असताना त्याच्या आश्रयस्थानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच वाघांना इतरत्र हालविण्याचा विचार सरकार करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अतिशय सावध भूमिका घेत मनुष्याप्रमाणे वाघांनाही स्थलांतरित करताना त्यांच्याही विचार करावा, असा सल्ला दिला आहे. मात्र, आता वाघांच्या भ्रमणमार्गावर अधिक भर देऊन त्यातील मानवी हस्तक्षेप कमी करणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT