मुंबई : अजित पवार गटाचा आगामी काळातील अजेंडा ठरला असून याची सविस्तर माहिती खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेचं समर्थन मिळतंय असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ७ जानेवारीला मुंबई अजितदादा गटाचा मेळावा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. (Decision taken by Ajit Pawar is getting support Sunil Tatkare told agenda)
तटकरे म्हणाले, आज सकाळी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात आगामी काळातील अजेंडा आम्ही राज्याच्या जणतेसमोर ठेवला आहे. आज दिवसभर अजित पवारांच्या घरी सर्व सेलबाबत बैठका झाल्या आहेत. राज्यात अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला समर्थन मिलळ आहे. ७ तारखेला मुंबई राष्ट्रवादीचा मेळावा आहे. (Latest Marathi News)
त्यांनतर ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहरात दौरा होणार आहे. पुढे १३ तारखेला परभणी आणि धाराशिव इथं, १४ तारखेला महायुतीचे एकत्रित मेळावे होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात १२०० ते १५०० कार्यकर्ते येतील. ५ तारखेला मुंबईत दादा भुसे यांच्या बंगल्यावर महायुतीची बैठक आहे. त्यानंतर १८ तारखेला महिला मेळावा मुंबईत पार पडणार आहे. (Marathi Tajya Batmya)
तसेच जानेवारी आणि फेबुवरी महिन्यात आमच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांचे दौरे होणार आहेत. त्यानंतर महायुतीचे ६ विभागात मेळावे होणार आहेत. जागा वाटपासंदर्भात लवकरच चर्चा सुरू होईल. आमचं कर्जत इथं शिबिर झालं आहे. यामध्ये आमचा अजेंडा आम्ही सेट केला आहे, असंही यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.