home flat sakal
महाराष्ट्र बातम्या

Home : भारतात भाडे तत्त्वावरील घरांमध्ये घट; बंगळुरू, चेन्नई, हैद्राबादमध्ये घरांना सर्वाधिक मागणी

सद्यस्थितीत शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या संधी यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात होणाऱ्या स्थलांतरितांची संख्या वाढते आहे, अशावेळी भारतात भाडेतत्वावर घर घेणाऱ्याची संख्या वाढते आहे.

सकाळ वृत्तसेवा

सद्यस्थितीत शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या संधी यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात होणाऱ्या स्थलांतरितांची संख्या वाढते आहे, अशावेळी भारतात भाडेतत्वावर घर घेणाऱ्याची संख्या वाढते आहे.

मुंबई - सद्यस्थितीत शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या संधी यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात होणाऱ्या स्थलांतरितांची संख्या वाढते आहे, अशावेळी भारतात भाडेतत्वावर घर घेणाऱ्याची संख्या वाढते आहे. मात्र त्या तुलनेत उपलब्ध घरांच्या संख्येत घट होतं असल्याचे एका अहवालातून निदर्शनात आले आहे. शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि आयटी हबची पंढरी मानल्या चेन्नई, बंगळुरू आणि हैद्राबादमध्ये भाडेतत्वारील घरांना सर्वाधिक मागणी आहे.

मॅजिकब्रिक्स या भारतातील प्रमुख ऑनलाईन रिअल इस्टेट प्लॅटफॉर्मने 'मॅजिकब्रिक्स रेंटल हाउसिंग इंडेक्स जानेवारी ते मार्च २०२३ चा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, सद्यस्थिती देशात सरासरी घर भाड्यांमध्ये दरमहा ४.१% आणि वार्षिक १५.३%ची वाढ नोंदविली गेले आहे. या अहवालात पुढे असे निदर्शनास आले की, ही घट नोंदविली असतानाचं भाड्याच्या घरांची मागणी तिमाही ७.३% आणि वार्षिक ३ .३% वाढली, तर पुरवठा तिमाही ५.७% आणि वार्षिक १७.८% ने कमी झाला.

चेन्नई (१४.३%), बेंगळुरू (१२.२%), आणि हैदराबाद (१०.८%) येथे भाड्याच्या घरांना सर्वाधिक मागणी आहे. शिवाय, सर्व्हेक्षणासाठी निवडलेल्या १३ शहरांपैकी नोएडा वगळता सर्व शहरांत भाड्याच्या घरांच्या पुरवठ्यात घट दिसून आली आहे. यामध्येही २ बीएचके ही सर्वाधिक पसंतीची भाडे मालमत्ता असताना आता ३ बीएचकेची मागणी जवळजवळ तिमाही ६% ने वाढली, ज्यामध्ये प्रशस्त घरांना वाढती पसंती दिसून येते, असेही या अहवालात समोर आले आहे.

मॅजिकब्रिक्सचे सीईओ सुधीर पै म्हणाले, 'भारतीय रेंटल हाऊसिंग मार्केटमध्ये उत्साह आहे. तसेच पुढील तीन महिन्यांत तो उत्साह कायम राहणार असल्याची खात्री मॅक्रो इकॉनॉमिक ट्रेंडने दिली आहे. दक्षिणेकडील प्रमुख शहरांमधील मागणी आणि पुरवठा यामध्ये लवचिकता आहे. कारण ही शहरे देशभरातील प्रतिभावंत आणि कौश्यल्यपूर्ण तरुणाईला आकर्षित करत आहेत. तर गुरुग्राम आणि पुणे ही सद्यस्थितीत या क्षेत्रात आशादायी चित्र निर्माण करत असलेली अन्य उल्लेखनीय शहरं आहेत. कारण ही शहर स्थलांतरितांना आकर्षित करत आहेत. एकूणच, या बाजारातील गतिशीलता सूचित करते. रिअल इस्टेट उद्योगाकरिता व्यवसायातील सातत्य आणि प्रगतीसदृश परिवर्तन यामुळे भारतीय रेंटल हाऊसिंग मार्केटमध्ये शाश्वत वाढ दिसून येते आहे."

शहरनिहाय ठळक मुद्दे -

शहर मागणी पुरवठा भाडे

अहमदाबाद 5.9% -3.6% -0.8%

बेंगळुरू 12.2% -5.8% 3.9%

चेन्नई 14.3% -9.3% 1.3%

दिल्ली -1.8% - 4.7% 0.7%

ग्रेटर नॉयडा -10.3% -0.7% 2.7%

गुरुगाम 8.9% -12.0% 8.2%

हैदराबाद 10.8% -0.6% 4.9%

कोलकाता -0.9% -0.1% 2.0%

मुंबई 5.1% -2.9% 4.2%

नवी मुंबई 5.5% -18.8% 1.4%

नॉयडा -0.7% 4.2% 5.1%

पुणे 7.8% -7.7% 2.9%

ठाणे 5.2% -13.1% -0.5%

(हे निकष जानेवारी-मार्च २०२३दरम्यान तिमाही-दरतिमाही बदलाचे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT