new electricity connections esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : वीजनिर्मितीत घट, मागणीत मात्र दुपटीने वाढ! भारनियमन अटळ

नीलेश छाजेड

Maharashtra News : राज्यात दीर्घ कालावधीनंतर एक ते दोन दिवस झालेला पाऊस वगळता राज्यात पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने विजेची मागणी सर्वत्र वाढली आहे. २२ ते २३ हजार मेगावॉटवरून विजेची मागणी २६ हजारांवर गेली. दुसरीकडे वीज निर्मितीत देशात क्रमांक दोनवर असणारी महानिर्मितीचा ग्रीडमधील विजेचा हिस्सा ५० टक्क्यांहून कमी होत असल्याचे चित्र आहे.

पावसाने पुन्हा एकदा ओढ दिल्याने राज्यातील विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उष्णतेमुळे पंखे, वातानुकूलित यंत्रे, कूलर, व वाणिज्य मागणी वाढलेली आहे. (Decrease in power generation and double increase in demand in maharashtra news)

महानिर्मिती कंपनीची क्षमता १३ हजार १५२ मेगावॉट असताना गुरुवारी (ता. १४) दुपारी चारला अवघी पाच हजार ९०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती. महानिर्मितीची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता नऊ हजार ५४० मेगावॉट इतकी आहे. जलविद्युत दोन हजार ५८० मेगावॉट, उरण वायू ६७२ मेगावॉट, सौर ३५९.८० मेगावॉट अशी असतानाही ४० ते ५० टक्केच वीज फक्त राज्याच्या ग्रीडमध्ये पुरवली जात आहे.

खासगीतील जिंदाल एक हजार २२४ मेगावॉट, अदानी तीन हजार १८०, आयडीयल २७८, रतन इंडिया एक हजार ७६, ‘एसडब्ल्यूजीपीएल’ ४७५ व इतर असा आठ हजार ६०० मेगावॉट ग्रीडमध्ये पुरवठा होता. केंद्राकडून सुमारे दहा हजार मेगावॉट हिस्सा घेऊन गरज भागवली जात होती.

उरण वायू प्रकल्पास हवा तसा गॅस उपलब्ध होत नसल्याने १४० मेगावॉट, जलविद्युत ३४३ मेगावॉट, सौर ४६ मेगावॉट अशी एकूण पाच हजार ९६१ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती. राज्याची मागणी २६ हजार, तर सर्व स्रोतांतून १६ हजार ४४ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाचा फटका बसत असताना आता बहुतांश भागांत भारनियमनाचा फटका अटळ आहे. महानिर्मितीची स्थापित क्षमता १३ हजारांवर असताना ग्रीडमध्ये ६० टक्क्यांहून अधिक विजेचा पुरवठा खासगी कंपन्यांचा व उर्वरित केंद्राकडून हिस्सा घेऊन भागविला जात आहे.

कोराडी - २१९०, १०९०

खापरखेडा - १३४०- ८२३

पारस - ५०० - ३६९

परळी - ७५० - ५६६

चंद्रपूर - २९२० - ११५७

भुसावळ - १२१० - ६५५

एकूण औष्णिक वीज ः ५०२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT