deepak kesarkar says Devendra fadanvis will put his understanding over bjp nilesh rane critisism  
महाराष्ट्र बातम्या

निलेश राणे X केसरकर; म्हणाले, लहान मुलाची समजूत फडणवीस काढतील!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर आता शिंदे गट आणि भाजप यांच्यात घमासान सुरू झाल्याचे समोर आले आहे. कोकणातील दोन नेते, भाजपचे निलेश राणे आणि शिंदे गटाचे दिपक केसरकर यांच्यात नवा वाद समोर आला आहे.

दीपक केसरकर यांनी राणेंची दोन्ही मुलं लहान आहेत, त्यांना समज देण्याची गरज असल्याचे म्हटले होते, यानंतर निलेश राणे यांनी यासंबंधी ट्वीट केले आहे. ते म्हणाले आहेत की, दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका, त्यानंतर त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा, असे लिहीत एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे.

निलेश राणे यांनी त्या व्हिडीओमध्ये केसरकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले आहेत दीपक केसरकर आपण युती मध्ये आहोत हे विसरू नका, जेवढी युती टिकायची जबाबदारी आमच्यावर आहेत तेवढी तुमच्यावर देखील आहे, तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता आमचे नाही, असे निलेश राणे यांनी म्हणाले आहे.

केसरकर काय म्हणाले?

यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे, ते म्हणाले की, नारायण राणेंची मुलं लहान आहेत आणि त्यांना समजवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतील. ते काय ट्वीट करतात ते मी वाचत नाही. लहान-लहान मुलं ट्वीट करत राहतात, लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात, कोणी गांभिर्याने त्याच्याकडे बघत नाही, पण हे एवढं गंभीर असेल तर मी महाराष्ट्रात गेल्याबरोबर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालेल ते त्यांना समज देतील आणि ते सुधारतील. ते शत्रू थोडेच आहेत, असेही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT