मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी मंगळवारी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे दोन स्वदेशी युद्धनौका लॉन्च केल्या आहेत. यामुळे भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही युद्ध नौका मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत भारतात निर्मिती केल्या गेल्या आहेत. दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका एकाच वेळी लॉन्च करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे MDL ने म्हटले आहे. (Defence Minister Rajnath Singh Launches INS Surat And Frigate INS Udaygiri )
काय आहे युद्धनौकांची खासियत...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लॉन्च केलेल्या या दोन्ही युद्धनौकांना पर्वत आणि शहराची नावे देण्यात आली आहेत. दोन्ही युद्धनौकांची रचना नौदल रचना संचालनालया (DND) अंतर्गत करण्यात आली असून, याची संपूर्ण निर्मिती MDL, मुंबई येथे करण्यात आली आहे. सुरत ही नौका 15B वर्गाची असून क्षेपणास्त्र विनाशक आहे, तर उदयगिरी ही P17A वर्गाची दुसरी स्टेल्थ युद्धनौका आहे.
INS सूरत
INS सूरत हे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 15B चे पुढील श्रेणीतील स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर असून, हे 7400 टन वजनाचे आहे. याची लांबी 163 मीटर इतकी असून, वेग ताशी 56 किलोमीटर असणार आहे. यावर बोटीसह चार ऑफिसर, 50 अधिकारी आणि 250 खलाशी साधारण 45 दिवस समुद्रात राहू शकतात.
INS उदयगिरी
INS उदयगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A ची तिसरी फ्रीगेट युद्धनौका आहे. स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका आधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज अशी आहे. यात उन्नत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे. नौदलाच्या या प्रकल्पांतर्गत देशातच 7 फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.