Delhi high court dismisses uddhav thackeray plea against election commissions freezing order shiv sena party symbol  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! आता धनुष्यबाणासंदर्भात दिल्ली हायकोर्टानेही...

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आज शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे पक्षाचे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून न्यायालयाद याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

निवडणुक आयोगाने ने 8 ऑक्टोबर रोजी ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'शिवसेना' नाव किंवा 'धनुष्यबाण' हे चिन्ह वापरू नये असे निर्देश दिले होते. शिवसेना पक्षातील दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे देण्यात आली होती. याचिका फेटाळताना, न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी मात्र दोन्ही पक्षांचे आणि जनतेचे हित लक्षात घेऊन प्रलंबित विवादाचा शक्य तितक्या लवकर निवाडा करण्याचे निर्देष ECI ला दिले आहेत.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

8 ऑक्टोबर रोजी निवडणुक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणुक चिन्ह गोठवले होते. दरम्यान पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगानं हा निर्णय घाईमध्ये घेतला यावेळी नियमांचं पालन झालेलं नाही, असे म्हटले होते. दरम्यान ज्या कारणासाठी धनुष्यबाण गोठवलं होतं, ते कारण आता राहिलेलं नाही. त्यामुळे आता स्थिती पूर्वरत करावी, असे याचिकामध्ये म्हटलं होतं.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवीन निवडणुक चिन्ह आणि नाव देण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून उद्धव गटाने यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान आज ठाकरे यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आणि एकनाथ शिंदे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील राजीव नायर आणि नीरज किशन कौल यांनी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT