Admission Sakal
महाराष्ट्र बातम्या

अकरावीची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी

राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

पुणे - राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल लागून १८ दिवस ओलांडले आणि आता जुलै महिन्याचा पहिला आठवडा देखील सुरू झाला आहे. मात्र शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा तातडीने सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन म्हणजेच महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशास विलंब होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी अद्यापही या प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा सुरू झालेला नाही. अशाचप्रकारे प्रवेश प्रक्रिया सुरू राहिल्यास अकरावीचे वर्ग सुरू होण्यास ऑक्टोबर महिना उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीएसई यासह अन्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट न पाहता शासनाने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनही प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीचे निवेदन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT